शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

सूक्ष्म नियोजनाकरीता समिती

By admin | Updated: December 5, 2015 00:19 IST

दीपक केसरकर : जिल्हा नियोजन समिती सभागृहात बैठक

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नैसर्गिक स्त्रोत विकासातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. या अंतर्गत सूक्ष्म नियोजन आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीतील सदस्यांच्या सूचना लक्षात घेवून जिल्हास्तरीय यंत्रणांनी सूक्ष्म नियोजनाकरीता जिल्हास्तरीय यंत्रणांनी परिपूर्ण माहिती सादर करणे आवश्यक आहे, अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात, राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोनती अभियानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, शास्त्रज्ञ बाळासाहेब दराडे, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटरचे मुंबई येथील विभागप्रमुख विवेकानंद घारे, जिल्हास्तरीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.दीपक केसरकर म्हणाले, सूक्ष्म आराखड्याच्या अनुषंगाने आतापर्यंत झालेल्या बैठकीत प्रत्येक विभागनिहाय चर्चा करण्यात आली आहे. सुक्ष्मच आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी मुख्यालयातून सर्व टीम आलेली आहे. या टीमला सर्व विभागप्रमुखांनी सहकार्य करावे व जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणारा सूक्ष्म आराखडा परिपूर्ण बनवावा, असेही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शाश्वत विकास करण्यासाठी प्रत्येक शासकीय योजनांमधील तफावत शोधून ती भरून काढण्यासाठी प्रत्येक विभागानी सूक्ष्म माहिती सादर करावी असे आवाहन राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोनती अभियानच्या संचालक लीना बनसोड यांनी केले. शासनाच्या प्रत्येक विभागाने पूर्ण क्षमतेने जिल्ह्यात कोणत्या नाविन्यपूर्ण योजना राबवता येतील याची माहिती या समितीसमोर सादर करणे आवश्यक आहे. प्रत्येक घटकाचा सर्वांगीण शाश्वत विकास करण्यासाठी प्रत्येक विभागाने जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपल्या योजनांचे सादरीकरण करणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य शासन यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच प्रत्येक विभागनिहाय राबविण्यात येणाऱ्या योजनांचा समन्वय साधून विकास होणे गरजेचे आहे. ज्या योजनेसाठी शासनाचा निधी एखाद्या विभागाला प्राप्त होत नाही त्यासाठी या आराखड्याअंतर्गत तरतूद प्रस्तावित करावी, असेही संचालक लिना बनसोड यांनी सूचित केले.(प्रतिनिधी)घारे : नैसर्गिक साधन संपत्तीचे होणार जतनजिल्ह्यातील नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व विकासासाठी सर्वदूर संवेदन व भौगोलिक माहिती प्रणालीचा परिणामकारकरित्या उपयोग करण्यात येणार आहे, असे मत महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटरचे मुंबई येथील विभागप्रमुख विवेकानंद घारे यांनी या बैठकीत स्पष्ट केले. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटरच्या माध्यसमातून जिल्ह्यातील मृद व जलसंधारण, वन व जैव विविधतेचा अभ्यास, पिकक्षेत्र अंदाज, पाणलोट क्षेत्र विकास व व्यवस्थापन, सागर किनारा अभ्यास, शहर विकास त्याचबरोबर इको सिस्टीम संतुलनात होणाऱ्या बदल नोंदीसाठी दुहेरी लक्ष ठेवण्यात येणार आहे.एक व्यक्ती कायमस्वरूपी ठेवणारजिल्ह्यात या सेंटरची एक व्यक्ती कायमस्वरूपी ठेवण्याचाही विचार असल्याचे मत महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटरचे मुंंबई येथील विभागप्रमुख विवेकानंद घारे यांनी व्यक्त केले.