शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचा दौरा लांबणीवर?

By admin | Updated: November 4, 2015 00:08 IST

जगबुडी नदीपात्र : डोह विकसित करण्याच्या आशा पल्लवीत

खेड : जलयुक्त शिवाराच्या माध्यतातून खेड तालुक्यातील जगबुडी नदीवर डोह जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार होते. मात्र, त्यांचा हा दौरा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.महाळुंगे गावातील जगबुडी नदीच्या उगमस्थानापासून खेड शहराकडे वाहात असलेल्या नदीपात्रातील पाण्याचा डोह जलयुक्त शिवार योजना आणि लोकसहभागातून विकसित करण्यात येणार आहे. ‘व्हिलेज पर्यटन’ बनवण्याची शासनाची अभिनव योजना आहे. या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत डिसेंबर महिन्यात करण्यात येणार आहे. मात्र, हा दौरा मुख्यमंत्र्यांच्या नियोजित परदेश दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रद्द होण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. यामुळे आगामी काही दिवसात मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याची शक्यता आहे.कुलूमनालीसारखे निसर्गसौंदर्य कोकणात आहे. यामुळे साहजिकच अनेक पर्यटकांना येथील निसर्ग भुरळ घालतो. एकूणच पर्यटकांना कोकणच्या ग्रामीण भागातील जीवनमान आणि राहणीमान याबाबत नेहमीच कुतूहल आहे. येथील वातावरणात पर्यटक हरवून जातात. त्यांना येथील मनोरंजनपर कार्यक्रमांचेही अप्रूप वाटते. त्यामुळे पर्यटनाद्वारे येथील आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. याच धर्तीवर जगबुडी नदीचा प्रवाह अडवून तेथे डोह बांधण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. बंधाऱ्याच्या माध्यमातून अडवल्या जाण्याऱ्या पाण्याचा उपयोग आधुनिक शेती आणि भाजीपाल्यासह दुग्ध व्यवसायासाठी करण्यात येणार आहे. लोकसहभागातून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गावपातळीवर कमिट्या स्थापन करून पर्यटनाला वाव देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यावेळी यादवराव यांनी हातलोट घाटातून वाहतुकीला प्रारंभ केल्यानंतर महाबळेश्वरजवळ येणारे परदेशी पर्यटक कोकणात येण्यास राजी होतील, यामुळे कोकणचे निसर्गसौंदर्य जगाच्या नकाशावर येणार आहे. (प्रतिनिधी)व्हिलेज पर्यटन : शासनाचा उपक्रमकोकणातील पर्यटनाला चालना मिळावी, त्याचबरोबर येथील निसर्गसंपदेतून आर्थिक विकासाला चालना देण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यासाठी ‘व्हिलेज पर्यटन’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.'परदेश दौराडिसेंबरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. पण, परदेश दौऱ्यामुळे ते अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे.