शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दोन परीक्षा केंद्रांवर दहावीच्या ४५० प्रश्नपत्रिका अपुऱ्या

By admin | Updated: March 6, 2015 00:09 IST

परीक्षेची वेळ बदलली : कोकण बोर्डाचा सावळागोंधळ; चिपळुणात २५०, अलोरेत २०० प्रश्नपत्रिका पडल्या कमी

चिपळूण : तालुक्यातील युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण व न्यू इंग्लिश स्कूल अलोरे या दोन केंद्रांवर दहावीच्या परीक्षेसाठी गुरुवारी संयुक्त हिंदीच्या ४५० प्रश्नपत्रिका कमी पडल्याने शिक्षण विभागाची तारांबळ उडाली. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आणि काही काळातच प्रश्नपत्रिकांच्या कडेकोट बंदोबस्तात झेरॉक्स काढून त्या परीक्षा केंद्रावर पोहोचविण्यात आल्या. अखेर दुपारी १२.४५ वाजता पेपर सुरू झाला. दहावीची परीक्षा दि. ३ मार्च पासून सुरू झाली आहे. चिपळूण शिक्षण विभागाअंतर्गत पाच हजार ५५६ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. युनायटेड इंग्लिश स्कूल केंद्र क्र. ६२०४ येथे ९४६ विद्यार्थी परीक्षेला बसले असून, त्यातील २५० विद्यार्थ्यांनी संयुक्त हिंदी विषय घेतला आहे. उर्वरित विद्यार्थी संपूर्ण हिंदीसाठी बसले आहेत. अलोरे केंद्र क्र. ६२०१ या केंद्रावर २२३ विद्यार्थी हिंदी संयुक्त, तर १५७ विद्यार्थी हिंदी संपूर्ण विषयाची परीक्षा देत होते. संयुक्त हिंदीचे विद्यार्थी ४७३ असतानाही त्यासाठीच्या गठ्ठ्यात केवळ ५०च पेपर बोर्डाकडून पाठविण्यात आले होते. सकाळी १०.१५ वाजता परिरक्षक मोहिते, उपपरिरक्षक एम. बी. पाटील, युनायटेडचे मुख्याध्यापक के. पी. शिंदे यांच्या ही बाब निदर्शनास येताच मोहिते यांनी कोकण बोर्डाचे सचिव आर. बी. गिरी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, तहसीलदार वृषाली पाटील यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. कोकण बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स काढण्याचा निर्णय झाला, परंतु दोन-तीन ठिकाणी प्रयत्न करूनही कोणी झेरॉक्स काढून देण्यास तयार होत नव्हते. अखेर बाजारपेठेतील एका कॉम्प्लेक्समधील झेरॉक्स मालकाने प्रसंगावधान राखून सहकार्य केले. तेथे शूटिंग करण्यात आले व पोलीस बंदोबस्तात झाडाझडती करून कर्मचाऱ्यांची तपासणी केल्यानंतर प्रश्नपत्रिकांची झेरॉक्स काढण्याचे काम सुरू झाले. १२ वाजता २०० प्रश्नपत्रिका अलोरे केंद्रावर पोलीस बंदोबस्तात पाठविण्यात आल्या. त्यानंतर २५० प्रश्नपत्रिका युनायटेड इंग्लिश स्कूलसाठी देण्यात आल्या. दुपारी १२.४५ वाजता दोन्ही केंद्रांवर परीक्षा सुरळीत सुरू झाली. ११ वाजता संबंधित विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुखांनी सूचना दिल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली असली, तरी परीक्षा प्रक्रिया शांततेत पार पडली. झेरॉक्स प्रती करताना माध्यमिक शिक्षणाधिकारी अहिरे, गटशिक्षणाधिकारी मोहिते, नायब तहसीलदार टी. एस. शेजाळ, पुरवठा अधिकारी केतन आवले, सहायक पोलीस निरीक्षक इंगोले, महिला पोलीस अधिकारी जाधव, प्रकल्प अधिकारी एस. एस. सावंत यांच्यासह पोलीस कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. प्रश्नपत्रिकांच्या बंदोबस्तातच त्या केंद्रावर पोहोचविण्यात आल्या. (प्रतिनिधी)