शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

राणे समर्थकांना मनसेचा पर्याय

By admin | Updated: July 3, 2014 23:58 IST

शैलेश भोगले : नीतेश राणेंनी केला कार्यकर्त्यांचा अपमान

कणकवली : लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची कारणीमिमांसा करताना नीतेश राणे यांनी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी ठेकेदार बनल्याने नीलेश राणे यांचा पराभव झाल्याचे मान्य केले आहे. गेली २५ वर्षे नारायण राणेंसोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांचा त्यामुळे एकप्रकारे अपमानच झाला आहे. अशी टीका करतानाच राणे समर्थकांनी खऱ्या अर्थाने स्वाभिमानला आता आपला स्वाभिमान दाखवावा आणि मनसेसारखा चांगला पर्याय निवडावा, असे आवाहन मनसेचे जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले यांनी केले.कणकवली येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाध्यक्ष जयसिंग नाईक, अनिल राणे, समीर आचरेकर, शैलेंद्र नेरकर उपस्थित होते. शैलेश भोगले पुढे म्हणाले, नीलेश राणे यांचा पराभव रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झाला हे नीतेश यांनी मान्य केले. बंधुप्रेमापोटी आपल्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना ते दोष देत आहेत. गेली २५ वर्षे ही स्थिती अशीच असताना पालकमंत्री अथवा नीतेश राणे यांना त्याची जाणिव झाली नाही. रस्त्यावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष करून आपण विकास करतो आहे असे भासविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सिंधुदुर्गात पर्यटन हा महत्वाचा मुद्दा असताना रस्ते दर्जेदार व सुस्थितीत असणे आवश्यक होते.नजिकच्या गोवा राज्याचा विकास पर्यटनामुळे झाला हे माहित असतानाही सिंधुदुर्गात मात्र राणे यांच्याकडून जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. मनसेने रस्त्यावरील खड्ड्याचा प्रश्न तसेच समर्थकांच्या दहशतीविषयी आवाज उठविला होता. यावेळी मनसे जनतेची दिशाभूल करीत असल्याचे काँग्रेसवाल्यांचे म्हणणे होते. मात्र, पराभवानंतर काँग्रेसला ठेकेदारांनी घेरले आहे, असे सांगितले जात आहे. इतकी वर्षे राणे यांनी ठेकेदरांच्या बळावर राजकारण केले. असेच एकप्रकारे त्यांनी मान्य केले आहे. राणेंसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे समर्थक त्यांच्यासमवेत शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले. मात्र, आपण ही मोठी चूक केल्याची भावना या समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यांना लाचारपणाचे जगणे जगावे लागत आहे. कार्यकर्ता हा भाऊ अथवा मित्र असल्याची भावना आवश्यक असताना ते नोकर आहेत असे नीतेश राणे यांना वाटत आहे. त्यामुळे समर्थकांनी आपला स्वाभिमान जागृत करावा. त्यांनी मनसेसारखा चांगला पर्याय स्वीकारल्यास प्रामाणिक कार्यकर्त्यांचे आम्ही स्वागतच करू, असेही भोगले म्हणाले. (वार्ताहर)