शहरं
Join us  
Trending Stories
1
निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

बसस्थानक जागेच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांची मंजुरी

By admin | Updated: June 27, 2014 01:02 IST

वैभववाडीतील जनता दरबारात आमदारांनी दिली माहिती

वैभववाडी : वैभववाडीतील नियोजित सुसज्ज बसस्थानकासाठी अल्पबचतची ३८ गुंठे जागा एसटी महामंडळाला विनामूल्य देण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर तालुकावासीयांच्या स्वप्नपूर्तीमधील सर्वात मोठा अडथळा दूर झाला आहे, अशी माहिती आमदार प्रमोद जठार यांनी येथे आयोजित जनता दरबार कार्यक्रमात दिली. तसेच जनतेच्या समस्यांबाबत विविध खात्यांचा आढावा घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात आमदार जठार यांनी जनता दरबार आयोजित केला होता. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, तालकाध्यक्ष सुहास सावंत, सरचिटणीस राजेंद्र राणे, गजानन पाटील, मनोहर फोंडके, गटविकास अधिकारी एम. एम. जाधव, कृषी अधिकारी शरदचंद्र नानिवडेकर, बालविकास प्रकल्प अधिकारी शरद मगर, महसूल अव्वल कारकून दीपक खरात, गटशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर, लघुपाटबंधारे उपअभियंता शितोळे आदी उपस्थित होते. बीएसएनएल सेवेतील अडचणी उपस्थितांनी मांडल्या. त्याला अनुसरून सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी बीएसएनएलच्या इंटरनेटच्या गतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. इंटरनेट सेवेतील अडचणींमुळे कार्यालयीन कामावर परिणाम होत असून जनतेचा रोष नाहक ओढवून घ्यावा लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, या समस्येवर पुण्यातूनच तोडगा काढला जाऊ शकतो, असे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. नावळे- सडुरे खोरीसाठी तातडीने बीएसएनएलचा टॉवर उभारण्याची सूचना जठार यांनी यावेळी केली. धोकादायक विजेचे खांब, कमी दाबाने होणारा वीज पुरवठा, वीज जोडण्या देण्यासाठी होत असलेला विलंब यासंदर्भात नागरिकांनी तक्रारी मांडल्या. त्यावर धोकादायक खांब तातडीने बदला आणि विनाविलंब शेतीपंपाच्या जोडण्या पूर्ण करण्याच्या सूचना आमदार जठार यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. करूळ केगदवाडीच्या वीज प्रश्नावरून आमदार जठार यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. तेथे अनेक पिढ्यांचे वास्तव्य असताना भोवतालचे जंगल संरक्षित करून वनखात्याने केगदवाडीच्या जनतेच्या रस्ता, वीज, पाणी, शिक्षण या मुलभूत हक्कांवर गदा आणली हे बरोबर नाही. जंगल संरक्षित करताना वनखात्याने या सुविधा पुरविण्यासाठी लागणारी जागा मोकळी का सोडली नाही? असा सवाल करीत जी चूक वनखात्याने केली ती त्यांनीच निस्तरून त्या जनतेला सुविधा पुरवाव्यात, अन्यथा तेथील नागरिकांचे योग्य पुनर्वसन करावे, अशा शब्दात आमदार जठार यांनी वनअधिकारी व कर्मचाऱ्यांना ठणकावले. राज्यातील आघाडी सरकार बदलल्याखेरीज शिक्षण क्षेत्रात सुरू झालेला सावळागोंधळ थांबणार नाही आणि गोरगरीबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणार नसल्याचे आमदार जठार यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)