रत्नागिरी : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कोकण विभागीय समितीची पुनर्रचना करण्यात आली असून, अध्यक्षपदी राजाभाऊ लिमये यांची निवड करण्यात आली आहे. या समितीची बैठक २ डिसेंबर रोजी रत्नागिरीत होणार असल्याचे अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. कोकण विभागीय समितीमध्ये पाच जिल्ह्यांचा समावेश असून, नवीन समितीचा कार्यकाल तीन वर्षांसाठी आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुंबईतील विश्वस्त मंडळाने या समितीला मान्यता दिली आहे. समितीच्या उपाध्यक्षपदी डॉ. श्रीरंग कद्रेकर यांची निवड करण्यात आली आहे. सचिव अनिल नेवाळकर, कोषाध्यक्ष एम. के. गावडे, सदस्य बाबा कदम, फाल्गुनी रजपूत, वि. मा. निकम, मीनाक्षी डाकवले, डॉ. तानाजी चोरगे, सुनील शिर्के, जान्हवी बेलोसे यांची निवड करण्यात आली आहे.विभागीय समितीमध्ये आणखी दोन सदस्य वाढविण्याचा निर्णय विचाराधीन आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काही सदस्य यात घेण्याबाबत विचार केला जात आहे. लवकरच त्याची मंजुरी घेतली जाणार आहे. सध्या विभागीय समितीचे कार्यालय टिळक आळी येथे हलविण्यात आले असून, समितीची पहिली सभा २ डिसेंबर रोजी होणार असल्याचे लिमये यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
चव्हाण प्रतिष्ठान विभाग अध्यक्षपदी लिमये
By admin | Updated: November 9, 2014 23:32 IST