शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

सभापतींचा अधिकारी वर्गावर अंकुश नाही

By admin | Updated: June 20, 2014 23:12 IST

कुडाळ पंचायत समिती सभा : अतुल बंगे यांचा आरोप

कुडाळ : गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत पंचायत समिती सदस्यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांना, समस्यांना येथील अधिकारी वर्गाकडून समर्पक उत्तरे मिळाली नाहीत, समस्याही सुटल्या नाहीत. येथील अधिकारी वर्गावर सभापती, उपसभापती यांचा कोणताही अंकुश नाही. त्यामुळेच पंचायत समितीच्या कारभारात काहीच सुधारणा झाली नाही, असे आरोप सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचे पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यानी मासिक बैठकीत करून घरचा आहेर दिला. कुडाळ पंचायत समितीची मासिक सभा पंचायत समितीच्या छत्रपती संभाजीराजे सभागृहात उपसभापती बबन बोभाटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक, पंचायत समिती सदस्य, संबंधित विभागांचे सर्व अधिकारी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादीच्या पंचायत समिती सदस्यांनी विविध प्रश्न, समस्या याबाबत संबंधित विभागांना धारेवर धरले. यावेळी बंगे यांनी बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोप करताना नेरूर-कवठी या रस्त्याच्या दुर्दशेबाबत प्रश्न उपस्थित केला. या रस्त्यासंदर्भात बांधकाम विभाग समर्पक उत्तरे देत नसून या विभागाने केलेली बांधकामेही निकृष्ट दर्जाची असल्याचे सांगितले. हिर्लोक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये २ जून रोजी सायंकाळी पेशंट आणला असता तेथील वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचारी आरोग्य कें द्र बंद करून निघून गेल्याचे दिसून आले. आरोग्य विभाग जनतेला हीच सेवा देत आहे काय, असा सवाल दीपक नारकर यांनी दिला. हिर्लोक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका आणि चालकही नाही, आॅक्सिजनची सोय नसल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याने याठिकाणी रुग्णवाहिका व चालक तसेच इतर सोयीसुविधा द्याव्यात, अशी मागणीही नारकर यांनी केली. यावेळी एमएसईबी, शिक्षण विभाग व एसटी विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. सभापती व उपसभापती, संबंधित अधिकारी यांनी इतर पंचायत समिती सदस्यांना विश्वासात न घेता ३ लाख ७५ हजाराचे अंदाजपत्रक कोणत्या कामाचे काढले, असा प्रश्न बंगे यांनी उपस्थित केला. तेच या अंदाजपत्रकातून करण्यात येणाऱ्या अभ्यांगत कक्ष व इतर कामांचे नियोजन कसे करणार, याचा खुलासा करण्याची मागणी के ली. सभेच्या सुरुवातीस केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच यूपीएससी परीक्षेत देशात १३२ वी आलेली कुडाळची प्राजक्ता ठाकूर, एसएससी परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेली स्वरमयी सामंत व इतर विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. (प्रतिनिधी)