शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधींसाठी ‘सीईटी’ अनिवार्य करावी

By admin | Updated: May 26, 2014 01:16 IST

महेंद्र नाटेकर : स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघटनेची सभा

 कणकवली : लोकप्रतिनिधी होण्यासाठी सीईटी परीक्षा अनिवार्य केल्यास प्रशासन गतिमान होऊन विकासाचा वेग वाढून जनसामान्यांचे प्रश्न सुटून देश समर्थ बनेल, असे ठोस विचार स्वतंत्र कोकणचे प्रा. महेंद्र नाटेकर यांनी व्यक्त केले. स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघटनेची सभा संस्थेच्या कार्यालयात आयोजित केली होती. त्यावेळी नाटेकर बोलत होते. यावेळी शिवाजी देसाई, वाय. जी. राणे, बाबुराव आचरेकर, श्रुतिशया डोंगरे, जी. पी. सावंत आदी उपस्थित होते. नाटेकर म्हणाले, राजेशाही, हुकूमशाही व लोकशाही या भिन्न शासन पद्धती, त्यातील लोकशाही ही सर्वोत्कृष्ट शासन पद्धती आहे. लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांसाठी, लोकांनी चालविलेले राज्य होय. इंग्लंड, अमेरिकेप्रमाणेच स्वातंत्र्योत्तर कालखंडात आपणही लोकशाही शासनपद्धतीचा अवलंब केला. इंग्लंड, अमेरिकेचे लोक सुजाण असल्याने कोणत्याही आमिषाला बळी न पडता राज्यकारभार करायला सक्षम लोकप्रतिनिधी निवडून पाठवितात. परंतु आपले बहुसंख्य लोक अशिक्षित, अडाणी असून उच्चशिक्षित, अभ्यासू व प्रभावी वक्ता पाठविण्याऐवजी जाती- पाती, धर्म, पैसे व दहशत यांच्या ओझ्याखाली दबून आपला उमेदवार निवडतात. त्यामुळे आपली लोकशाही जाती-पाती, धर्म, भ्रष्टाचार व दहशत यांच्यामध्ये गटांगळ््या खात आहे. यातून सुटका करून घेऊन राष्ट्र समर्थ पायावर उभे करण्यासाठी सक्षम लोकप्रतिनिधी निवडून जाणार्‍यांसाठी सीईटी परीक्षा अनिवार्य करणे आवश्यक आहे. नुकत्याच निवडून आलेल्या खासदारांची शैक्षणिक पात्रता कशी आहे पहा- पाचवी पास- ६, आठवी पास- ९, दहावी पास- ४८, बारावी पास- ५७, पदवीधर- १६, पदव्युत्तर- १५०, व्यवसाय पदवी- १०६, डॉक्टरेट- ३३, इतर १० मिळून एकूण ५४१. यातील बहुसंख्य खासदार अप्रशिक्षित असून हे देशाचा कारभार कसा करणार? शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, कारकून, अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर आदींची सीईटी परीक्षा घेऊन ते आपली जबाबदारी पार पाडण्यास सक्षम आहेत याची खात्री करून घेऊन त्यांच्या नेमणुका केल्या जातात. तसेच ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार होण्यासाठी निश्चित शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता ठरविण्याची आवश्यकता आहे. ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी किमान एस.एस.सी. पास व ग्रामपंचायत अ‍ॅक्टवर आधारीत परीक्षा पास, जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी उमेदवार किमान एच.एस.सी. पास व जिल्हा परिषद अ‍ॅक्ट परीक्षा उत्तीर्ण असावा. आमदार होण्यासाठी उमेदवार किमान पदवीधर असावा व राज्यघटना तसेच राज्याने वेळोवेळी केलेले कायदे यावर आधारीत परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच खासदार होण्यासाठी भारतीय राज्यघटना व संसदेने वेळोवेळी केलेले कायदे यावर आधारीत परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. परीक्षा पास होण्यासाठी किमान ६० टक्के गुण मिळविणे आवश्यक असावे. असे उत्तीर्ण झालेले उमेदवार कोणत्याही राजकीय पक्षातून किंवा स्वतंत्रपणे निवडणुका लढवू शकतील. कायदा व नियमांचा चांगला अभ्यास झाल्याने प्रशासनावर मांड ठोकून विकासाची घोडदौड करता येईल. अल्पशिक्षित, गुंडप्रवृत्तीचे लोक या परीक्षा उत्तीर्ण न होऊ शकल्याने राजकारणातील गुंडगिरीचे प्रमाण फारच कमी होईल. लोकशाही सक्षम होऊन राष्ट्र मजबूत पायावर उभे राहील, असे नाटेकर म्हणाले. विश्वनाथ केरकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)