शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या जागेमुळे बंधाºयाचा खर्च पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 15:21 IST

पाचल : राजापूर तालुका कृषी विभागाने नियम व निकष धाब्यावर बसवत तसेच कोणत्याही तांत्रिक बाबी विचारात न घेता तळवडे -भटवाडी येथील ओढ्यावर चुकीच्या ठिकाणी बंधारा बांधला आहे. पहिल्याच पावसात हा बंधारा गाळाने भरला असून, पाण्याखाली गेला आहे. 

ठळक मुद्देपहिल्याच पावसात बंधारा पाण्याखाली नियम व निकष धाब्यावर शासनाचे लाखो रूपये कामावर खर्च ग्रामस्थांची जिल्हाधिकाºयांमार्फत चौकशी करण्याची मागणी

पाचल : राजापूर तालुका कृषी विभागाने नियम व निकष धाब्यावर बसवत तसेच कोणत्याही तांत्रिक बाबी विचारात न घेता तळवडे -भटवाडी येथील ओढ्यावर चुकीच्या ठिकाणी बंधारा बांधला आहे. पहिल्याच पावसात हा बंधारा गाळाने भरला असून, पाण्याखाली गेला आहे. 

या बंधाºयातील पाणी कमी करण्यासाठी अखेर कृषी विभागावर बंधाºयाचा काही भाग तोडण्याची नामुष्की ओढवली. शासनाचे लाखो रूपये या कामावर खर्च झाले आहेत. त्यामुळे या बंधाºयाच्या कामाची जिल्हाधिकाºयांमार्फत चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.हा बंधारा पाचल - जवळेथर रस्त्यावरील मोरीलगतच बांधल्याने बंधाºयातील तुंबलेल्या पाण्यामुळे मोरीलाही धोका निर्माण झाला आहे.

या बंधाºयापासून काही अंतरावर बारमाही वाहणारी अर्जुना नदी आहे. तसेच बंधाºयाच्या आजुबाजूला शेती अथवा वस्तीही नाही. त्यामुळे नेमका हा बंधारा कोणासाठी बांधण्यात आला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा बंधारा बांधताना अधिकाºयांनी तांत्रिक बाबींचा विचार केलेला दिसत नाही. शासनाच्या अंदाजपत्रकाप्रमाणे बंधाºयाचे काम झाले नसल्याचे उघड झाले असल्याचेही तळवडे येथील ग्रामस्थांनी सांगितले. हा बंधारा योग्य जागी बांधला असता तर त्याचा उपयोग गावासाठी झाला असता असेही ग्रामस्थांनी सांगितले.

बंधाºयाचे मुल्यांकन करताना उपअभियंत्याच्या या गोष्टी लक्षात का आल्या नाहीत, असा सवाल तळवडे येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. कृषी विभागाने चुकीच्या ठिकाणी बांधलेल्या बंधाºयामुळे शासनाचे लाखो रूपये वाया गेले आहेत. त्यामुळे तळवडेतील या बंधारा कामाची जिल्हाधिकाºयामार्फत चौकशीची मागणी केली आहे.