शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
4
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
5
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
6
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
7
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
8
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
9
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
10
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
11
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
12
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
13
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
14
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
15
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
16
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
17
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
18
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
19
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
20
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...

काजू व्यावसायिकांना भरपाई द्यावी

By admin | Updated: December 29, 2014 00:07 IST

बाबल नाईक : अवकाळी पाऊस ठरला पिकासाठी हानिकारक

कसई दोडामार्ग : अवकाळी पावसामुळे व बदललेल्या वातावरणामुळे काजू बागायतीला फटका बसून जवळजवळ ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. तरीही कृषी विभागाकडून नुकसानाचे पंचनामे न झाल्याने कोकणातील काजू व्यावसायिकांना नुकसान भरपाई मिळणार नाही. त्यामुळे काजू व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. शासनाने याची दखल घेऊन काजू व्यावसायिकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काजू व्यावसायिक बाबल नाईक यांनी केली आहे. मोहोर येत असताना पडलेला अवकाळी पाऊस काजू उत्पादनासाठी धोकादायक ठरला आहे. या पावसामुळे काजू व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. यासाठी कृषी विभागाने पंचनामे करावेत, अशी मागणी केली होती. मात्र, शासनाच्या उदासिन धोरणामुळे कृषी विभागाने याची साधी दखलसुद्धा घेत बागायतींना भेटही दिली नाही. याचा फटका काजू व्यावसायिकांना बसला आहे. त्यामुळे काजू व्यावसायिकांनी पत्रकारांना बोलावून काजू बागांची पाहणी करून घेतली. यावेळी केलेल्या पाहणीत काजू बागायतींना अवकाळी पावसाचा बराच फटका बसल्याचे दिसून आले. काजू मोहोर करपून गेला असून काही झाडांना मोहोर न येता पालवी आली असल्याचे आढळून आले. यामुळे काजू पीक होणार नाही, असे नाईक यांनी सांगितले. यावेळी चंद्रशेखर देसाई, काजू व्यावसायिक सूर्यकांत देऊलकर, शरद गवस, मायको गवस, सुुवदास मणेरीकर, शरद नाईक उपस्थित होते. यावेळी बाबल नाईक म्हणाले, ज्यावेळी काजू झाडांना मोहोर येतो, त्याचवेळी अवकाळी पाऊस पडल्याने आलेला मोहोर करपून गेला व झाडांना मोहोर येण्याऐवजी नवीन पालवी आली. त्यामुळे विकसित १ या काजू झाडांना फटका बसला आहे. ही जात हंगामात एकदाच मोहरते. तसेच १ ते १७ काजू बागायतदारांना याचा फटका बसला आहे. तसेच दमट हवामानामुळे कीटकांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. झाडांच्या फांदीचा रस शोषून हे कीटक नष्ट करतात. त्यामुळे मोहोर आलेल्या फांद्या करपून गेल्या आहेत. असे असताना कृषी विभागाने बागायतदारांची विचारपूसही केली नाही. झाडांचे पंचनामे केले नाहीत. शासनाच्या जाचक अटीमुळे कोकणातील काजू बागायतदार, सुपारी बागायतदार, नारळ बागायतदार, आंबा बागायतदार यांना नुकसान भरपाई मिळत नाही, अशी खंत व्यक्त केली. तसेच येथील हवामानाचा विचार करून शासनाने नियमावली तयार करावी. तसेच पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बाबल नाईक यांनी दिला आहे. उद्योजक चंद्रशेखर देसाई म्हणाले, तालुक्यात ३२०० हेक्टर काजू क्षेत्राची नोंद असली, तरी यापेक्षा अधिक पटीने काजू बागायतीचे क्षेत्र आहे. परंतु त्याची नोंद कृषी विभागाकडे नाही. जंगली भागात मोठ्या प्रमाणात काजू लागवड केली जाते. नुकसानग्रस्त बागायतदारांसह काजू उद्योजकांनाही आर्थिक सहकार्य करणे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली. (वार्ताहर)