शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारफेरी : शिक्षणमंत्री तावडे, पालकमंत्री केसरकर यांचा सहभाग

By admin | Updated: October 30, 2015 22:40 IST

वैभववाडीत युतीचे शक्तिप्रदर्शन

वैभववाडी : नगरपंचायत निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी भाजप शिवसेनेने आपल्या दोन मंत्र्यांना प्रचारात उतरवून महायुतीने वैभववाडीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शिक्षणमंत्री विनोद तावडे व पालकमंत्री दीपक केसरकर यांनी युतीच्या उमेदवारांसमवेत ढोलताशांच्या गजरात शहरात प्रचारफेरी काढून शहराच्या विकासासाठी युतीच्या हाती नगरपंचायतीची सत्ता देण्याचे मतदारांना आवाहन केले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे हेलिकॉप्टरने दुपारी येथील अर्जुन रावराणे विद्यालयाच्या पटांगणावर आगमन झाले. तेथे पालकमंत्री दीपक केसरकर, शिवसेना आमदार वैभव नाईक, माजी आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, सरचिटणीस प्रमोद रावराणे, जयेंद्र्र रावराणे आदींनी मंत्री तावडे यांचे स्वागत केले. तेथून लगेच युतीच्या प्रचार फेरीला प्रारंभ झाला. प्रभाग दोन माईणकरवाडी येथे चहापान उरकल्यावर प्रचार फेरी वैभववाडी शहरात आली. शहरातील व्यापारी मतदारांना साद घालत मंत्रीमहोदय प्रभाग सहा मधून थेट सज्जनराव रावराणे यांच्या घरी पोहोचले. तेथे मतदारांशी संवाद साधला. नागरिकांच्या समस्याही तावडे, केसरकर यांनी समजून घेतल्या. प्रभाग अकरा, बारा, आठमधून प्रचार फेरी पुन्हा मुख्य बाजारपेठेत दाखल झाली. केंद्र्र आणि राज्य सरकारने वर्षभरात घेतलेल्या लोकोपयोगी आणि महत्वाकांक्षी निर्णयांची पत्रके युतीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी नागरिकांना वाटली. ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करीत निघालेल्या युतीच्या प्रचारफेरीने वैभववाडी शहर दणाणून गेले होते. शिक्षणमंत्री तावडे, पालकमंत्री केसरकर या दोन मंत्र्यांसह आमदार वैभव नाईक, प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत काढलेल्या प्रचार फेरीमुळे शिवसेना, भाजप व आरपीआयच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. युतीच्या प्रचारफेरीत भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, सरचिटणीस प्रमोद रावराणे, राजू शेटये, युवासेना जिल्हाप्रमुख अ‍ॅड हर्षद गावडे, जयेंद्र रावराणे, अशोक रावराणे, सुहास सावंत, राजेंद्र्र राणे, संजय रावराणे, उत्तम सुतार, मंगेश लोके, नंदू शिंदे, श्रीराम शिंगरे, शंकर नारकर व युतीचे उमेदवार आणि शिवसेना, भाजप, आरपीआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रचार फेरीचा समारोप करुन शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि पालकमंत्री दीपक केसरकर हेलिकॉप्टरने दोडामार्गला निघून गेले. (प्रतिनिधी)