शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पंचक्रोशीवर आधारित पर्यटन आराखडा तयार करा

By admin | Updated: November 1, 2015 00:13 IST

दीपक केसरकर : ओरोस येथे ग्राम पर्यटनाबाबतच्या बैठकीत मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी : ग्राम पर्यटनाच्या दृष्टीने शासनाच्यावतीने संपूर्ण कोकणाकरिता ४५ कोटींची तरतूद करण्यात आली असून यामध्ये पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्गचा महत्वाचा वाटा आहे. त्या अनुषंगाने या जिल्ह्यातील ग्राम पर्यटनाच्या विकासाकरिता पंचक्रोशींवर आधारित पर्यटन विकास आराखडा तयार करा, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. शरदचंद्र पवार भवन, ओरोस येथे आयोजित व्हिलेज टुरिझम व ग्राम पर्यटनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात, ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्लेचे डॉ. साळवी, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे डॉ. मुणगेकर आदी मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, पर्यटनातून प्रत्येक घरी विकास पोहचला पाहिजे. यासाठी पर्यटनावर आधारित कामांचा प्रामुख्याने विचार होणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतींनी आपली बलस्थाने ओळखून त्या धर्तीवर पर्यटन विकास आराखडा तयार करावा. जिल्ह्यातील धार्मिक पर्यटन स्थळे, वर्षा पर्यटन स्थळे, थंड हवेची ठिकाणे या सर्व पर्यटनस्थळांची एकमेकांशी सांगड घालणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यातील खाद्यसंस्कृती, जंगलसफर, लोककला व जैवविविधता यावर आधारित पर्यटन विकासाचे प्रस्ताव तयार करण्यात यावेत. तरी ग्रामस्थांनी आपल्या पंचक्रोशीत असलेल्या पर्यटनस्थळांवर तसेच पर्यटकांना उपलब्ध करून द्यावयाच्या सोयीसुविधांवर आधारित आराखड्याचे नियोजन करावे. आमदार वैभव नाईक म्हणाले, केवळ रस्ते तयार केल्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल असे नाही तर पर्यटनाच्या संपूर्ण विकासाकरिता पर्यटनाला चालना देणाऱ्या बाबींचे योग्य नियोजन करणे आवश्यक असून, उत्तम नियोजन असेल तर कमी पैशातही आपल्या पंचक्रोशीच्या पर्यटनाचा विकास होऊ शकेल. जिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भरपूर प्रमाणात जैववैविधता असून पर्यटन विकास आराखडा तयार करताना जैववैविधता संवर्धनाच्या दृष्टीने विचार होणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत पातळीवर जैववैविधतेची समिती गठीत करून त्या- त्या पंचक्रोशीतील दुर्मीळ प्राणी, वनस्पती, पक्षी यांच्या नोंदी घेणे आवश्यक असून जैववैविधतेच्या अनुषंगाने पर्यटकांना आकर्षित करून पर्यटनाला चालना मिळू शकेल. तसेच ग्रामपंचायतींनी भौगोलिक परिस्थितीवर आधारित पर्यटन विकास आराखडा तयार करावा, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्लेचे डॉ. साळवी, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे डॉ. मुणगेकर यांनी आपले विचार मांडले. (प्रतिनिधी) नवाबागची फिशर पर्यटन व्हिलेज म्हणून निवड जिल्ह्यातील गावांचा पर्यटनावर आधारित विकास करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून नवाबाग या गावाची पर्यटन फिशर व्हिलेज म्हणून निवड करण्यात आली आहे. या गावामध्ये पर्यटन फिशर व्हिलेज म्हणून विकास करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. धनगर समाजाच्या समस्या सोडविणार : पालकमंत्री जिल्ह्यातील धनगर समाजाच्या मागण्या लक्षात घेता प्रशासनाने या समाज बांधवांना शासकीय योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी एक मास्टर प्लॅन बनवावा, त्यानुसार घेण्यात येणाऱ्या योजना याची माहिती सादर करावी, वाडीनिहाय घेण्यात येणाऱ्या जनसुविधांची यादी बनवावी व त्यानुसार समाज कल्याण विभागाने या कामाला प्राधान्य देऊन आराखडा सादर करावा.