शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

भाऊबीज निधी देतोय शिक्षण संस्थेला हात

By admin | Updated: October 23, 2014 22:53 IST

मेधा पाटणकर : गेली बारा वर्षे राबवताहेत आगळावेगळा उपक्रम

असगोली : संस्कृत विषयाच्या शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्यानंतरही सेवा म्हणून संस्कृतचे मोफत वर्ग घेणाऱ्या मेधा पाटणकर गेली १२ वर्षे दिवाळीच्या सुटीत भाऊबीज निधी जमवून महर्षी स्त्री शिक्षण संस्थेला देत आहेत.विशेष म्हणजे पाटणकर केवळ एकट्याने हे काम न करता बँकेचे शाखा व्यवस्थापक, निवृत्त कर्मचारी, शिक्षण, विद्यार्थी यांच्या माध्यमातून हा निधी गोळा करतात. महर्षी स्त्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब, निराधार, स्त्रियांसाठी शिक्षण व रोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी बनवले जाते. नेहमीच्या शिक्षणाबरोबरच अभियांत्रिक शिक्षण, फॅशन डिझायनिंग, नर्सिंग इत्यादी व्यवसायाभिमुख शिक्षण दिले जाते. वृद्ध स्त्रियांसाठी वृद्धाश्रम चालवला जातो. या संस्थेने १९१९ साली भाऊबीज निधी संकलन योजनेला सुरुवात केली. यात जमणाऱ्या गंगाजळीमधून महाराष्ट्रातील गरीब, गरजू, हुशार, होतकरु मुलींना शिक्षणासाठी संधी दिली जाते. अन्य कुठेही हा निधी खर्च केला जात नाही.गुहागर तालुक्यातील वेळंब येथील लक्ष्मीबाई विनायक ओक भाऊबीज निधीचे काम करत असत. त्यांच्या बरोबरीने मेधा पाटणकर यांनी भाऊबीज निधीचे काम करण्यास सुरुवात केली. वृध्दत्त्वामुळे निधी जमवण्यासाठी करावी लागणारी धावपळ जमत नसल्याने ओक यांनी या कामाची पूर्ण जबाबदारी पाटणकर यांच्याकडे सोपवली. गुहागरच्या गोपाळकृष्ण विद्यामंदिरमध्ये संस्कृत शिकवणाऱ्या पाटणकर यांनी हे काम एकट्याने न करता विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन निधी जमवण्याच्या कामाला सुरुवात केली. आज केवळ विद्यार्थीच नाही तर बँकेतील शाखा व्यवस्थापक, काही शिक्षक-प्राध्यापक, निवृत्ती घेतलेले ग्रामस्थ त्यांना या कामात मदत करत आहेत. पाच वर्षांपूर्वी पाटणकर निवृत्त झाल्या. पण, त्यानंतरही संस्कृतचे मोफत वर्ग घेणे आणि महर्षी स्त्री शिक्षण संस्थेसाठी भाऊबीज निधी जमवून देण्याचे काम त्यांनी सुरु ठेवले आहे. तसेच दिवाळी आली की, देणगीदार आवर्जून निधीची आठवण करतात, असेही पाटणकर यांनी सांगितले. (वार्ताहर)बँकेचे शाखा व्यवस्थापक, निवृत्त कर्मचारी, शिक्षण, विद्यार्थी यांच्या माध्यमातून केला जातो निधी गोळा.भाऊबीज निधीतून राज्यातील गरीब, गरजू, हुशार, होतकरु मुलींना दिली जाते शिक्षणासाठी संधी.यापूर्वी वेळंब येथील लक्ष्मीबाई विनायक ओक करत होत्या भाऊबीज निधीचे काम.