शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

मळेवाडला वादळाचा जोरदार तडाखा

By admin | Updated: June 17, 2014 01:15 IST

सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून मळेवाड परिसरात सोमवारी सांयकाळी सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह ढगाचा कडकडाटामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले

मळेवाड : सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून मळेवाड परिसरात सोमवारी सांयकाळी सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह ढगाचा कडकडाटामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या वादळामुळे ढगांच्या कडकडाटात अनेक जणांचे टीव्ही तसेच विद्युत प्रवाह जळून खाक झाले आहेत. यात मनुष्यहानी झाली नसली, तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. याबाबतची नोंद महसूल दप्तरी उशिरापर्यंत नव्हती. त्यामुळे पंचनामे करण्यात आले नव्हते. याबाबत माहिती अशी की, सावंतवाडी तालुक्यात सोमवार सकाळपासून मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत होता. हा पाऊस थांबून कोसळत असल्याने अनेक प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यातच तालुक्यातील काही गावात पावसाबरोबर ढगांचा कडकडाट झाल्याने भर पावसात ग्रामस्थांना अंधारात रहावे लागत आहे. मळेवाडमध्ये तर सांयकाळी उशिरा पावसामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. अचानक जोरदार पाऊस तसेच विजेच्या कडकडाटामुळे मळेवाड गावातील विद्युत प्रवाह पूर्णपणे खंडित झाला आहे. काही वाड्यांवर अचानक पडणाऱ्या विजेच्या लोळामुळे टीव्ही तसेच वीज प्रवाह करणारे विद्युत पोल जळून खाक झाले आहेत. घरातील मीटरमध्ये अचानक आग लागून विद्युत पुरवठा खंडित होत होता. या घडलेल्या प्रकाराने ग्रामस्थही भयभीत झाले आहेत. या हानीत मळेवाड- मुरकरवाडी व आरोंदा रोड परिसरातील ग्रामस्थांचा समावेश असून प्रत्यक्ष पाहणीप्रमाणे मदन शंकर मुरकर, बाबा मुरकर, सीताराम रेडकर आदींचे दूरदर्शन संच जळून खाक झाले आहेत. तर विजेच्या लोळामुळे बऱ्याच ग्रामस्थांचे मीटर ही जळून खाक झाले आहेत. या सर्वाची पंचनामा यादी करण्याचे काम सुरू असून याची कल्पना महसूल विभागाला नसल्याने रात्री उशिरापर्यंत एकही अधिकारी किंवा गाव तलाठी गावात पोचला नव्हता. सावंतवाडीतील महसूल विभागाशी संपर्क साधला असता, नायब तहसीलदार शशिकांत जाधव यांनी कोणत्याही प्रकारची आपत्कालीन नोंद नसल्याचे सांगितले. त्यामुळे महसूल विभाग वरातीमागून घोडे नाचविण्याची शक्यता असून अनेक महत्वाचे अधिकारी गावातच राहत नसल्याचे स्पष्ट होत आहेत. हानी गावात तलाठी शहरात तालुक्यातील कोणत्याही गावात हानी झाली, तर तलाठी यांचे सहाय्यक आपल्या साहेबांना कल्पना देतात. त्यानंतर साहेब गावात पोचतात. ती पण महत्वाची घटना असेल, तर साहेब येतात आणि नसेल तर कर्मचाऱ्याला बघून घ्यायला सांगतात. तसाच प्रत्यय मळेवाडमध्ये आला असून या घटनेची कल्पना उशिरापर्यंत महसूल विभागालाच नसल्याचे दिसून आले. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)