शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

वादळाचा २0 घरांना तडाखा

By admin | Updated: March 30, 2015 00:24 IST

शिरशिंगे गाव अंधारातच : नुकसानीचा आकडा दहा लाखांवर

सावंतवाडी : शिरशिंगे येथील गोठवेवाडी, परबवाडी परिसरातील २० कुटुंबाना चक्रीवादळाचा तडाखा बसला. यामध्ये तब्बल १० लाखांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून महसूल विभागाचे अधिकारी सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामेच करीत होते. घराच्या नुकसानाबरोबरच केळी, अन्य बागायती चक्रीवादळात भुईसपाट झाल्या आहेत.शिरशिंगेसह कलंबिस्त, वेर्ले, सांगेली आदी ठिकाणी शनिवारी मुसळधार पाऊस कोसळत होता. यातच शिरशिंगे येथे मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ झाले. या चक्रीवादळाचा तडाखा एवढा प्रचंड होता की, अवघ्या एका तासात यामध्ये वीस घरांचे होत्याचे नव्हते झाले. तर पूर्ण गाव शनिवारी अंधारात होता. रविवारीही वीजवाहिन्या जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. काही घरात वीज आली नसल्याने त्यांचा रविवारही अंधारात गेला आहे.दरम्यान, या चक्रीवादळाचा फटका वीस घरांना बसला असून यात अनेक घराचे पत्रे उडून गेले आहेत. यामध्ये मानाजी घावरे, सुप्रिया घावरे, रावजी घावरे, दशरथ घावरे, संतोष पेडणेकर, भगवान परब, दशरथ परब, सदाशिव घावरे आदींचा समावेश आहे.यामध्ये प्रत्येकाच्या घराचे पत्रे उडून गेले आहेत तर काहींच्या घरावर झाडे कोसळली असल्याने घरात पाणी शिरले आहे. रस्त्यावर वीज वाहिन्याही मोठ्या प्रमाणात कोसळल्या आहेत. रविवारी तलाठी सचिन गोरे यांनी शिरशिंगे येथे जात पंचनामे केले. यावेळी अनेकांनी आपली कैफियत अधिकाऱ्यांकडे मांडली आहे.काहींच्या घरावर झाडे कोसळल्याने रात्र दुसऱ्याच्या घरात काढावी लागली असून पावसाचे पाणी प्रत्येकाच्या घरात शिरले आहे. (प्रतिनिधी)बागायती भुईसपाट; शेतकऱ्यांनी अश्रू ढाळलेया चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी जीवितहानी झाली नाही. मात्र, अनेकांच्या केळी बागायती भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते.