शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

सेना-राष्ट्रवादीला टक्कर देण्यास भाजपही सज्ज

By admin | Updated: April 17, 2015 00:05 IST

चिपळूण तालुक्यातील ८३ ग्रावांमध्ये पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली होती. त्यातील चिपळूण मतदार संघातील ४४ ग्रामपंचायती भाजप लढवत आहे.

चिपळूण : केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व राखण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यामुळे मतदारांना तिसरा राजकीय पर्याय उपलब्ध झाला आहे. सध्या सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील चित्र पाहता भाजपाविरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस अशीच लढत गावात आहे. केंद्रातील विजयानंतर अनपेक्षितपणे राज्यात भाजपाने सर्वाधिक जागा जिंकत प्रथम क्रमांक मिळवला. चौथ्या क्रमांकाचा पक्ष असलेला भाजप एकदम पहिल्या क्रमांकावर गेल्यानंतर राजकारणातील चित्र बदलले आहे. पंधरा वर्षांनंतर सत्ता हातात आल्यामुळे सत्तेचा उपयोग करुन ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. सभासद नोंदणीसह पक्षाचे विविध उपक्रम सुरु झाले आहेत. त्यामुळे एकूणच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व मिळण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. चिपळूण तालुक्यातील ८३ ग्रावांमध्ये पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली होती. त्यातील चिपळूण मतदार संघातील ४४ ग्रामपंचायती भाजप लढवत आहे. यापैकी ४ ग्रामपंचायती भाजपने बिनविरोध निवडून आणल्या आहेत. २८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ५५ गावांमध्ये निवडणुका सुरु आहेत. तसेच सत्तेचा उपयोग करुन स्थानिक स्वराज्य संस्थेवर वर्चस्व मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.भाजपकडे तालुका पातळीवर सक्षम कार्यकर्ता नसतानाही ग्रामपंचायतीमध्ये मुसंडी मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही माधव गवळी यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न सुरू ठेवले असल्याने अनेक युवक भाजपशी जोडले जात आहेत. ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्ते गाव पातळीवर भाजपचे पॅनल तयार करुन निवडणुकीच्या रणांगणात दंड थोपटून उभे आहेत. गाव पातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी भर दिला जात आहे. भाजपेतर कार्यकर्ते व नेते मंडळी भाजपशी जवळीक साधून पाठिंबा देत आहेत. त्यामुळे भाजप या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीला जोरदार टक्कर देईल, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. (प्रतिनिधी)