शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

दरड कोसळून भुईबावडा घाट बंद

By admin | Updated: August 6, 2016 00:28 IST

वाहतूक फोंडामार्गे : पुरामुळे गगनबावडा कोल्हापूर मार्ग ठप्प

वैभववाडी : संततधार पावसामुळे दरड कोसळून भुईबावडा घाटमार्ग शुक्रवारी दुपारपासून बंद झाला आहे, तर पुराच्या पाण्यामुळे गगनबावडा कोल्हापूर मार्ग पूर्णपणे ठप्प झाल्याने कोल्हापूर विजयदुर्ग मार्गावरील वाहतूक फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली आहे. दरम्यान, तालुक्यात दिवसभर मुसळधार पाऊस सुरू असून, नद्या, नाले दुथडी वाहत आहेत. परंतु, पावसाने नुकसान झाल्याची नोंद नाही.गेल्या तीन-चार दिवसांपासून वैभववाडी तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. शुक्रवारी सकाळी आठपर्यंत ८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दुपारी बाराच्या सुमारास भुईबावडा घाटात रिंगेवाडीपासून तीन किलोमीटर अंतरावर दरडीसह झाडे रस्त्यावर कोसळून घाटमार्ग बंद झाला. कोसळलेल्या दरडीचा ढिगारा अर्ध्या रस्त्यावर आला होता. मात्र, दरडीसह कोसळलेल्या झाडांमुळे संपूर्ण रस्ता बंद झाला. त्यामुळे गगनबावड्याहून भुईबावड्याकडे येणारी वाहने घाटात उशिरापर्यंत अडकून पडली होती. सायंकाळी उशिरापर्यंत घाटमार्ग सुरळीत झाल्याची माहिती बांधकाम विभागाकडून मिळू शकली नव्हती. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढल्यामुळे तुडुंब भरल्याने विजयदुर्ग कोल्हापूर राज्यमार्गावर कळे, मांडुकली, आदी ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे. त्यामुळे सकाळी साडेअकरानंतर गगनबावडा-कोल्हापूर मार्ग ठप्प झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली आहे. कोल्हापूरकडे जाणारी वाहने रोखण्यासाठी पोलिसांनी गगनबावडा येथे रस्त्यावर बॅरिकेटर्स लावले असून पोलीस कर्मचारीही तैनात केले आहेत.दरम्यान, करुळ व भुईबावडा घाट चढून गगनबावडा येथे पोहोचलेली अवजड वाहने गगनबावड्यातून माघारी न परतता तेथेच थांबली होती. पावसाचा जोर न ओसरल्यास पुढील दोन ते तीन दिवस गगनबावडा कोल्हापूर मार्ग बंद राहण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तर संततधार पावसामुळे करुळ आणि भुईबावडा घाटात दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे.संततधार सुरूचसिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासून संततधार सुरूच असून, कोठेही मोठी दुर्घटना घडल्याचे वृत्त नाही. भुईबावडा येथील दरड पावसाने कोसळण्याची एकमेव घटना घडली आहे. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप चालूच होती.