शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रकिनारा ‘सेफ स्विमिंग झोन’

By admin | Updated: November 3, 2015 00:01 IST

गुहागर : पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रांताधिकाऱ्यांसह नगरपंचायतीचा पुढाकार

गुहागर : गुहागर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक बुडण्याच्या दुर्दैवी घटना थांबवण्यासाठी प्रांताधिकारी रवींद्र हजारे, तहसीलदार वैशाली पाटील आणि गुहागर नगरपंचायतीने किनारपट्टीला सेफ स्विमिंग झोन बनवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यासाठी उत्कृष्ठ जलतरणपटू असलेल्या प्रशिक्षीत सुरक्षा रक्षकांची फळी तयार करण्यात येणार आहे.गुहागर समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे गुहागरला गालबोट लागत आहे. हा डाग पुसून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. गुहागरला येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही प्रशासनाची आहे. प्रशासकीय अधिकारी, नगरपंचायत आणि किनारपट्टीवरील नागरिक यांची बैठक प्रांताधिकारी हजारे यांच्या अध्यक्षतेखाली गुहागर तहसील कार्यालयात झाली. यावेळी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, नगराध्यक्षा स्नेहा वरंडे, अस्तित्व लाईफ सेव्हिंग या प्रशिक्षण संस्थेचे भूषण देशपांडे, सहाय्यक बंदर निरीक्षक संदीप दळवी, राजन दळी, गुहागर अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टचे मयुरेश साखरकर, प्रदेश तांडेल, अजय वायंगणकर, करण मोरे, मंडल अधिकारी एम. एस. तडवी, विक्रेता प्रतिनिधी उमेश भोसले, मनोज देवकर, अ‍ॅड. संकेत साळवी, पारस गुर्जन आदी उपस्थित होते.बुडणाऱ्या प्रत्येकाला वाचवणे, त्यांच्यावर चांगले वैद्यकीय उपचार करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यासाठी अस्तित्व लाईफ सेव्हिंग या संस्थेच्या माध्यमातून किमान दहा जलतरणपटूंना जीवरक्षक तैनात करणे हा आजच्या बैठकीचा मूळ उद्देश असल्याचे प्रांताधिकारी हजारे यांनी सांगितले. ‘अस्तित्व’चे भूषण देशपांडे यांनी ग्रामस्थ व मच्छीमार समाजातील इच्छुक तरुणांशी संवाद साधला.किनाऱ्यावर प्रशिक्षित मनुष्यबळ हे अशा शिबिरातून निर्माण करता येईल, असे देशपांडे म्हणाले. यावेळी तरुण जलतरणपटूंनी चर्चेत सहभाग घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद शिंगटे यांनी ग्रामस्थ आणि समुद्रकिनाऱ्यावरील विक्रेते यांना या कार्यात पुढाकार घेण्याचे आवाहन केले. गुहागरातील पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. समुद्र हे इथल्या पर्यटनाचे केंद्रस्थान आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी आपणच घेतली पाहिजे असे सांगितले.दि. २९ नोव्हेंबरपासून हे ८ दिवसांचे जीवरक्षक प्रशिक्षण शिबिर सुरु होत आहे. तत्पूर्वी पोहण्याचा चांगला सराव व्हावा म्हणून ३० आॅक्टोबरपासून एक महिना पोहण्याचा सराव कार्यक्रम आयोजित केला आहे. गुहागर समुद्रकिनाऱ्यावर हा सराव सुरु होणार आहे. इच्छुक तरुणांनी मयुरेश साखरकर, उमेश भोसले, गुहागर नगरपंचायत यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)लाईफगार्ड : दुर्घटना केवळ दुर्दैवीया दुर्घटना केवळ दुर्दैवी आहेत आणि इथल्या पर्यटनावर विपरीत परिणाम करणाऱ्याही आहेत. त्यासाठी समुद्रकिनारपट्टीवरील पोहता येणाऱ्या जास्तीतजास्त तरुणांनी रोज नियमित पोहण्याचा सराव करावा. ४८ तासांचे हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर अशा तरुणांना व्यापारी जहाजांवर, गोवा, केरळसारख्या पर्यटन किनारपट्ट्यांवर लाईफगार्डच्या नोकऱ्या मिळू शकतात. पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाची.प्रशासकीय अधिकारी, नगरपंचायत, नागरिकांची बैठक.बुडणाऱ्या प्रत्येकाला वाचवणे नैतिक जबाबदारी.अस्तित्व लाईफ सेव्हिंग संस्थेतर्फे जीवरक्षक तैनात करणार.जीवरक्षकांचे २९ नोव्हेंबरपासून प्रशिक्षण शिबिर.गुहागर समुद्रात सराव.सुरक्षा रक्षकसमुद्रकिनाऱ्यावर बुडणाऱ्या पर्यटकांना वाचविण्यासाठी प्रशिक्षीत सुरक्षा रक्षकांची फळी तयार करण्यात येणार आहे.