शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

‘हातपाटी’मागचे ग्रहण अजूनही कायम

By admin | Updated: September 24, 2015 23:51 IST

परवान्यांची मुदत अपुरी : नव्या परवान्यांसाठी प्रतीक्षा आॅक्टोबरची

रत्नागिरी : जिल्ह्यातील हातपाटी उत्खननासाठी जिल्हा प्रशासनाकडून मागवण्यात आलेल्या १३४ पैकी ९२ प्रस्तावांना मंजुरी देऊन त्यांना परवाने देण्यात आले आहेत. मात्र, त्यांना सप्टेंबरअखेर मुदत असल्याने आता नव्या परवान्यांसाठी पुन्हा आॅक्टोबरमध्ये मेरिटाईम बोर्डाकडून ‘ना हरकत’ दाखल्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ५०० ब्रासपर्यंतच्या वाळू उत्खननासाठी तात्पुरती परवानगी देण्याचा अधिकार जानेवारीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयाने पुन्हा बंदी लागू करण्यात आली होती. आता नदी, खाड्यांतील वाळू उत्खननासाठी परवाने देण्याचे अधिकार मेरिटाईम बोर्डाकडे देण्यात आले आहेत. मेरिटाईम बोर्डाकडून दापोली तालुक्यातील आंजर्ला खाडीतील तीन, दाभोळ खाडीतील एक, रत्नागिरी तालुक्यातील जयगड खाडीतील तीन आणि काळबादेवी खाडीतील एक अशा एकूण चार खाड्यांमधील ८ रेती गटांना हातपाटीसाठी रेतीसाठा निर्धारित करून देण्यात आला आहे. या खाडीतील हातपाटी उत्खनन परवान्यासाठी मेरिटाईम बोर्डाकडून नाहरकत दाखल्यासह आतापर्यंत १३४ प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले होते. त्यापैकी ९२ प्रस्ताव मंजूर करून त्यांना परवाने देण्यात आले. काहींनी चलन न भरल्याने त्यांना परवाने मिळाले नाहीत. अंतिम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. यासाठी मेरिटाईम बोर्डाकडून मिळालेल्या ‘ना हरकत दाखल्यां’ची मुदतही सप्टेंबरअखेरची आहे. परवाने देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने वाळू व्यावसायिकांच्या व्यवसायावरील ग्रहण कित्येक वर्षांनंतर सुटले आहे. मात्र, ही मुदत सप्टेंबरअखेर आहे. आता आॅक्टोबरमध्ये नव्याने प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत. यासाठी पुन्हा मेरिटाईम बोर्डाकडून परवानगी मिळवावी लागणार आहे. त्यानंतर या व्यावसायिकांना परवाने मिळणार आहेत. या परवान्यांची मुदत एक वर्षाची असेल. त्यामुळे आता या व्यावसायिकांना आॅक्टोबरची प्रतीक्षा लागून राहिली आहे. नवीन परवाने लवकर मिळण्याची मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)