शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

‘अवकाळी’ने आंबोलीला झोडपले

By admin | Updated: March 6, 2016 00:59 IST

ग्रामस्थांची त्रेधातिरपीट : छपरे उडाली, वीज खांब कोसळला

आंबोली : शनिवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने आंबोली परिसराला चांगले झोडपल्याने ग्रामस्थांची त्रेधातिरपीट उडाली. ठिकठिकाणी घरांवरील छप्पर कोसळून हजारोंची हानी झाली, तर वीज खांब रस्त्यावरच कोसळून वाहतुकीची कोंडी झाली. गेल्या चार-पाच दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला होता. कधी ढगाळ वातावरण, तर कधी पाऊस पडत होता. त्यामुळे पावसाची शक्यता व्यक्त होत होती. शनिवारी सायंकाळी सव्वा चार वाजता आंबोलीत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. सुमारे तासभर तो सुरू होता. अचानक सुरू झालेल्या पावसाने ग्रामस्थांची एकच तारांबळ उडाली. सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसाने क्षणार्धात जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. रस्त्यावरील वाहतूक कमी झाली, तर बहुतांशी दुकाने बंद करण्यात आली. सोसाट्याच्या वाऱ्याने जकातवाडी येथे रस्त्याच्या बाजूचा विजेचा खांब रस्त्यावर कोसळला. रस्त्याच्या मध्यभागीच हा खांब पडल्याने वाहनधारकांसह ग्रामस्थांत भीती पसरली. यावेळी काही ग्रामस्थांनी समयसूचकतेने दोन्ही बाजूंनी वाहने अडवली. वीज कार्यालयात दूरध्वनीवरून माहिती देऊन वीज बंद करण्याची सूचना केली. त्यामुळे सुदैवाने हानी झाली नाही. नांगरवाक येथे गणपत पाटील यांच्या घरावरील छपराचे सर्व पत्रे उडून सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच सविता धमकर, भागोजी येडगे, विठ्ठल येडगे, चौडू पाटील, पांडुरंग काकोरे यांच्याही घराच्या छपरावरील पत्रे व कौले उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. पत्रे उडून गेल्याने या सर्व घरात पाणी साचून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. तसेच जकातवाडी येथील परुळेकर यांच्यासह तिघाजणांच्या घराचे छप्पर उडून गेल्याने तेथेही मोठे नुकसान झाले. चितळशेत येथेही रामा पडते यांचे छप्पर उडून नुकसान झाले. (वार्ताहर) अनर्थ टळला, पण ‘महावितरण’बाबत संताप चार महिन्यांपूर्वी येथील विजेचे खांब बदलण्याची ग्रामस्थांनी मागणी केली होती. यासाठी महावितरणला निवेदन दिले होते. मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. सोसाट्याच्या वाऱ्याने जकातवाडी येथे वाहतुकीच्या रस्त्यावरच वीज खांब पडला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. यामुळे अनर्थ टळला असला तरी धोका मात्र कायम असल्याच्या भावना ग्रामस्थ व्यक्त करत होते. यावेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महावितरणच्या कारभारावर रोष व्यक्त केला. जीर्ण झालेले विजेचे खांब त्वरित बदलण्याची मागणी केली आहे.