शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, दुसऱ्यांदा म्हणाले...!
2
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
3
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
6
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
7
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
8
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
9
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
10
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
11
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
12
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
13
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
14
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
15
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
16
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
17
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
18
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
19
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
20
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?

लेखापरीक्षण लॉजवर

By admin | Updated: March 3, 2015 22:19 IST

मंडणगडमध्येही परीक्षण : वरिष्ठांचे आदेश धुडकावण्याचे प्रयत्न

चिपळूण : ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण कार्यालयात जाऊन करायचे असते, तसे स्पष्ट आदेश असताना चिपळूण पाठोपाठ गेले दोन दिवस मंडणगड तालुक्यात लॉजवर लेखापरीक्षण सुरु असून तेथेही ग्रामसेवकांकडून ३० ते ४० हजार रुपये घेतले जात असल्याची चर्चा ग्रामसेवकांमध्ये सुरु आहे. चिपळूण तालुक्यातील काही ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण लॉजवर केले जात असल्याचे निदर्शनास आल्यावर पाठपुरावा केला असता. हे अधिकारी ३० ते ४० हजार रुपये प्रत्येक ग्रामपंचायतीकडे मागत होते. लॉजवर महिला ग्रामसेवकालाही बोलवले जात असल्याने त्या संकोचत होत्या. लहान ग्रामपंचायतीना एवढी रक्कम देणे परवडत नव्हती. तालुक्यातील ९० टक्के ग्रामपंचायतीचे उत्पन्न एक लाखाच्या आत आहे. त्यामुळे ग्रामसेवक नाराज होते. या बाबत ‘लोकमत’ने आवाज उठवताच लेखापरीक्षण अर्धवट सोडून त्यांना परत बोलविण्यात आले. या बाबत ठोस कारवाई झाली नाही. या लेखापरीक्षण पॅनेलवर १७ ते १८ जणांचा समावेश आहे. चिपळूण मध्ये ठेच लागल्यावरही हे अधिकारी काही घडलेच नाही अशा थाटात मंडणगडमध्येही पैशाची मागणी करीत आहेत. आज (सोमवारी) मंडणगडमध्ये तीन ग्रामसेवक या अधिकाऱ्यांबरोबर होते. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या बाबत महालेखापाल विशाल गाडे यांच्याशी चौकशी केली असता ते बाहेर असल्याने फारसे काही बोलू शकले नाहीत. परंतु, याबाबत आपण वृत्तपत्रात वाचले असून, आणखी काही तक्रारीही आपल्याकडे आल्या आहेत. याबाबत संपूर्ण माहिती घेऊन कार्यालयीन कारवाई होईल असे सांगितले. चिपळूण तालुक्यातील काही ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण लॉजवर झाल्याने हा चर्चेचा विषय झाल्याने याची चौकशीही केली जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)लक्ष्मीदर्शन होते आहे...चिपळूण तालुक्यात लेखापरीक्षण करताना ३० ते ४० हजाराची मागणी केली जात होती, याबाबत ‘लोकमत’ने भांडे फोड करताच अधिकाऱ्यांनी गाशा गुंडाळला होता. पण, मंडणगड तालुक्यात लेखापरीक्षकांचे ग्रामसेवक स्वागत करीत आहेत. येथील अधिकाऱ्यांनाही ग्रामसेवक ल़क्ष्मीदर्शन घडवत आहेत. या अधिकाऱ्यांवर कोणाचाही अंकुश नसल्याने ते मनमानी रक्कम ग्रामसेवकांकडे मागत आहेत. त्यासाठी स्टेशनरीची व इतर खोटी बिलेही सादर करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.