शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

पती-पत्नींच्या सहजीवनावर आधारीत दृकश्राव्य

By admin | Updated: December 23, 2014 00:37 IST

यश वेलणकर : जांभेकर व्याख्यानमालेत तणावमुक्त जीवनाचा महामंत्र

देवगड : देवगड येथे उमाबाई बर्वे ग्रंथसंग्रहालय, राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमालेच्या अंतिम पुष्पामध्ये ‘तुमच्या आमच्या घरात’ या पतीपत्नींच्या सहजीवनावर आधारीत जीवनातील कंगोरे उलगडणारा व त्यावर हलक्याफुलक्या स्वरूपाच्या तोडग्यांमुळे हे जीवन सुसज्ज कसे होईल हे दर्शविणारा दृकश्राव्य कार्यक्रम डॉ. यश वेलणकर यांनी रसिकांसमोर रविवारी सायंकाळी सादर केला. स्त्री-पुरुषांच्या वैवाहिक सहजीवनामध्ये दोघांनीही एकमेकांची मानसिक व जैवशास्त्रीय जडणघडण लक्षात घेणे किती गरजेचे आहे या एका नवीनच पैलूला या संपूर्ण व्याख्यानामध्ये डॉ. यश वेलणकर यांनी स्पर्श केला. त्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीचे नायक-नायिका व खऱ्या जीवनातही पती-पत्नी असलेल्या अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर यांनी अभिनीत केलेल्या छोट्या छोट्या प्रसंगांच्या चित्रफितीमधून याबाबत समस्यांचे विवेचन केले. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, स्त्री-पुरुषांच्या जीवशास्त्रीय संरचनेतच मूलत: फरक असतो. स्त्रीकडे रंगभेदाचे बारीक निरीक्षण करण्यासाठी ठराविक हार्मोन्स असतात. तर त्यांची ५० टक्केहून जास्त कमतरता पुरुषात असते. पुरुष एकाचवेळी अनेक कामे करण्यासाठी सक्षम नसतो, तर स्त्रीकडे ही विशेष शक्ती असते. स्त्री स्थैर्यासाठी उत्सुक असते तर पुरुष सतत नाविन्यपूर्ण गोष्टींच्या मागे असतो. पुरुष एका ठराविक दृष्टीकोनातून कोणत्याही समस्येकडे बघतो तर स्त्री सर्वंकष दृष्टीकोनातून प्रत्येक गोष्टीकडे पाहते. स्त्रियांना भावनिक आधाराची गरज समस्या निवारण्यापेक्षा महत्वाची वाटते. तर पुरुष समस्या निवारणापुढे भावनेला कमी महत्व देतो. स्त्रियांना प्रत्येक व्यक्तीची देहबोली समजून घेण्याची कायम आवश्यकता वाटते तर पुरुष सरळसोट मार्ग पत्करतो. त्यामुळे स्त्रियांकडे ज्ञानेंद्रियांची शक्ती अपार असते. तर पुरुष स्नायूशक्ती (मसल पॉवर)चा वापर करताना दिसतो. या सर्व गोष्टींमध्ये हार्मोनल बॅलन्स सांभाळावा लागतो. पुरुषांमध्ये टेस्टेस्टेरॉन हार्मोन जास्त असतो. स्त्रीला नातेवाईकांची माहिती जास्त लक्षात राहते. कारण तिचे लक्ष चेहऱ्यांवर केंद्रीत असते. स्त्रीला नाते जोडणे, एकमेकांची आवडनिवड लक्षात ठेवणे, संपर्कातील व्यक्तींचे वाढदिवस, अन्य घटना लक्षात ठेवणे आवडते तर पुरुषांना कामापुरतेच या बाबींवर लक्ष ठेवणे आवडते. स्त्रीला स्पर्श भावना तीव्र असतात, त्यामुळे प्रत्येक कठीण प्रसंगात किंवा उत्कट प्रसंगात स्त्रीला स्पर्श सुखाची आवश्यकता भासते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन वैवाहिक जीवनात सर्व प्रसंगांना सामोरे गेल्यास अनेक संघर्षपूर्ण प्रसंगातून कशी सहज सोडवणूक होऊ शकते यावर दृकश्राव्य माध्यमाद्वारे डॉ. यश वेलणकर यांनी उपस्थितांना हलक्या फुलक्या तंत्राने मार्गदर्शन केले. या व्याख्यानानेच या व्याख्यानमालेची सांगता झाली. (प्रतिनिधी)