शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा

By admin | Updated: March 30, 2015 00:27 IST

बांदावासीयांची मागणी : शेती नुकसानीबाबत वनखात्याकडून केवळ पंचनाम्याचा फार्स

बांदा : बांदा शहर व परिसरात वन्य प्राण्यांकडून भातशेती तसेच बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून वनखात्याकडून केवळ नुकसानीच्या पंचनाम्याव्यतिरिक्त कोणतीच कार्यवाही करण्यात येत नसल्याने या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी बांदा ग्रामस्थांनी वनपाल एस. एस. शिरगावकर यांच्याकडे शनिवारी सकाळी निवेदनाद्वारे केली.शेतकऱ्यांना शेती नुकसानभरपाई प्रतिगुंठा केवळ २00 रुपये देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची वनखात्याकडून चेष्टा करण्यात येत असल्याचा आरोप करत ही नुकसानभरपाई वाढवून मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी डॅनी आल्मेडा यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी शिरगावकर यांना जाब विचारला.गेले कित्येक दिवस बांदा शहरातील शेटकरवाडी, गडगेवाडी, वाफोली, आरोसबाग या भागात गवा, सांबर, डुक्कर यांचा मुक्त संचार असून या वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या शेती बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या प्राण्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता या प्राण्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रकार घडले आहेत. या परिसरात शेतकऱ्यांनी नाचणी, मका, चवळी, भात आदी उन्हाळी पिके घेतली आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत शेती बागायती उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असता वनखात्याकडे या प्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी सामग्री नसल्याचे वनखात्याकडून सांगण्यात आले. वाढीव नुकसानभरपाई संदर्भात शेतकऱ्यांनी सावंतवाडी येथील वनकार्यालयात अर्ज देण्याची विनंती वनपाल शिरगावकर यांनी केली.यावेळी वनपाल एस. एस. शिरगावकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी लिपिक व्ही. एम. मांजरेकर उपस्थित होते. यावेळी उमा शेटकर, प्रमोद कोचरेकर, बाबू शेटकर, घनश्याम परब, रामचंद्र केरकर, नारायण शेटकर, शैलेश शेटकर, गणपत सुभेदार, गुंडू सुभेदार, सुरेंद्र सुभेदार, अमेय नाईक, परशुराम वडार, संजू वडार, मनोज शेटकर आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)अन्यथा आंदोलनशेती नुकसानीबाबत वनखात्याशी संपर्क साधला असता केवळ पंचनाम्याचा फार्स करण्यात येतो. प्रत्यक्षात मात्र नुकसानभरपाईच्या कित्येक पट कमी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते. याबाबत वनखात्याने विचार करून या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा कायदेशीर मार्गाने आंदोलन उभारण्याचा इशारा डॅनी आल्मेडा यांनी दिला.