शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

चार उपजिल्हाधिकारी पदांची नियुक्ती

By admin | Updated: July 5, 2014 00:01 IST

महसूल विभागात आता चार कायमस्वरूपी

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दोन उपजिल्हाधिकारी दर्जाचे व एक तहसीलदार अशा तीन अधिकाऱ्यांची बदली तर नव्याने सहा उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी व एका तहसीलदारांची नियुक्ती सिंधुदुर्गात झाली आहे. यामुळे महसूल विभागात आता चार कायमस्वरूपी उपजिल्हाधिकारी पदे भरली गेली आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा कार्यक्रम नुकताच झाला. यात सावंतवाडी उपविभागीय अधिकारी सुषमा सातपुते यांची बदली होऊन त्याजागी विठ्ठल इनामदार यांची नियुक्ती झाली आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी तेजस समेळ यांची रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी विशेष भूसंपादन अधिकारी ठाणे येथे कार्यरत असलेले अभय करगुटकर यांची नियुक्ती झाली आहे. सावंतवाडी तहसीलदार वीरसिंह वसावे यांची रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे तहसीलदारपदी बदली झाली तर त्यांच्या जागी मुंबई-कुलाबा येथे अतिक्रमणे व निक्षासन या पदावर काम करणारे सतीश कदम यांची सावंतवाडी तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली आहे. या तीनही अधिकाऱ्यांनी आपला पदभार स्वीकारला असल्याचे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले.चार विभागांना मिळाले कायमस्वरूपी उपजिल्हाधिकारीजिल्हा पुरवठा अधिकारी, सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, रोजगार हमी योजना या चार विभागांना गेले काही महिने ही पदे रिक्त होती. मात्र यावर्षी या चारही पदांवर उपजिल्हाधिकारी दर्जाचे कायमस्वरूपी अधिकारी मिळणार आहेत. यामध्ये रायगड येथील मुरूड भूसंपादन अधिकारी या पदावर कार्यरत असणाऱ्या जे. जी. मुरूडकर यांची सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून रवि पाटील यांची नियुक्ती झाली आहे. जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून उरण उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणारे श्रीधर डुबे यांची नियुक्ती झाली आहे तर रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारीपदी श्रीवर्धन उपविभागीयपदी कार्यरत असलेले जयराम देशपांडे यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान, या चारही अधिकाऱ्यांपैकी एकाही अधिकाऱ्याने आपला अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. लवकरच ते आपला पदभार स्वीकारणार असल्याचे महसूल सामान्य प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)

¸fWX