शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

डीएलडी प्रवेशासाठी १ जूनपासून अर्जविक्री

By admin | Updated: May 29, 2015 23:45 IST

सहा केंद्रे : जिल्हा शिक्षण, प्रशिक्षण संस्थेची माहिती

कुडाळ : प्राथमिक शिक्षण पदविका (डीएलडी) प्रवेशासाठी अर्जविक्री १ ते १५ जून या कालावधीत जिल्ह्यातील सहा केंद्रांवर होणार असल्याची माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्गचे प्राचार्य यांनी प्रसिध्दीपत्रकातून दिली आहे. प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, शैक्षणिक वर्ष २०१५-१६ या वर्षासाठी प्राथमिक शिक्षण पदविका (ऊ्रस्र’ङ्में ्रल्ल ए’ीेील्ल३ं१८ ए४िूं३्रङ्मल्ल) प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील प्रवेशासाठी आवेदन पत्राची विक्री १ ते १५ जून या कालावधीत होणार आहे. तसेच २ ते १६ जून या कालावधीत आवेदन पत्राची स्वीकृती होणार आहे. आवेदन पत्राची विक्री व स्वीकृती प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग नवनगर वसाहत, जिजामाता सर्कलजवळ, कृषिरत्न कॉम्प्लेक्स समोर, सुनितादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर मालवण ता. मालवण, के. एम. एस. अध्यापक विद्यालय मिठबाव ता. देवगड, विद्याविकास अध्यापक विद्यालय आजगाव ता. सावंतवाडी, बॅ. नाथ पै अध्यापक विद्यालय कुडाळ व के. बी. सावंत कनिष्ठ अध्यापक महाविद्यालय डिगस ता. कुडाळ या सहा केंद्रांवर होणार आहे. विक्री व स्वीकृती सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सुटीच्या दिवशीही सुरू राहील. मागासवर्गीय उमेदवाराने आवेदनपत्र घेताना जात प्रमाणपत्राची प्रत सादर करणे आवश्यक आहे. शासनमान्य अध्यापक विद्यालयाची यादी व परिशिष्टे ६६६.े२ूी१३.ङ्म१ॅ.ल्ली३ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. एकूण प्रवेश क्षमतेपैकी ७० टक्के प्रवेश विभागस्तरावरून व ३० टक्के प्रवेश राज्यस्तरावरून करण्यात येतील. प्रवेशास इच्छुक कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी शाखेतील पात्र उमेदवार १२ वीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी किमान ४९.५ टक्के गुणांसह उत्तीर्ण, तर मागासवर्गीय उमेदवार किमान ४४.५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याचे प्राचार्य, डायट, सिंधुदुर्ग यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)नोकरीची खात्री नाही राज्यात २ मे २०१० नंतर शिक्षक भरती परीक्षा (सीईटी) झालेली नाही. तसेच सन २०१३ मधील शिक्षक पात्रता परीक्षेस (टीईटी) ५,९१,९९० आणि सन २०१४ च्या शिक्षक पात्रता परीक्षेस (टीईटी) ३,८८,६९९ इतके विद्यार्थी बसले होते. ही वस्तुस्थिती पाहता प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना नोकरी मिळेलच याची खात्री नाही, असे पत्रकात म्हटले आहे.