शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

औषध फवारणी करण्याचे आवाहन

By admin | Updated: December 14, 2014 23:52 IST

रोग नियंत्रण : वेंगुर्ले प्रादेशिक संशोधन केंद्राचा सावधगिरीचा इशारा

वेंगुर्ले : तालुक्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणही ढगाळ बनले आहे. अशा परिस्थितीत निर्माण होणाऱ्या आंबा व काजू पिकांवरील रोगांच्या नियंत्रणाकरिता वेंगुर्ले प्रादेशिक संशोधन केंद्रातर्फे शेतकऱ्यांना औषध फवारणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्याची परिस्थिती ही पावसाळी सदृश असून हवामान खात्याने हलका पाऊस व ढगाळ हवामानाचा अंदाज वर्तविला आहे. नवीन येणाऱ्या मोहोरावर फुलकिडींचा प्रादुर्भाव आढळून येण्याची शक्यता असल्याने फुलकिडींच्या नियंत्रणासाठी ४५ टक्के स्पिनोसॅड २.५ मिली प्रती १० लिटर पाण्यातून झाडावर फवारावे. पावसाळी सदृश वातावरणामुळे काजू पिकात आलेल्या नवीन पालवीवर ढेकण्या या किडीचा प्रादुर्भाव होेण्याची शक्यता आहे. त्यासाठी ३६ टक्के मोनाक्रोटोफॉस १५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारावे.ज्या ठिकाणी मोहोर आलेला आहे, अशा ठिकाणी ढेकण्या या किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी ३५ टक्के प्राफेनोफॉस १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून मोहोरावर फवारावे. (प्रतिनिधी)करपा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव शक्यआंब्यावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. याकरिता थायोमेथॉक्झाम या औषधाची १ ते २ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात संपूर्ण झाडावर फवारणी करावी. तसेच आंब्यावर भुरी तसेच करपा या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यासाठी कार्बेन्डॅझिम (१० ग्रॅम), थायोफिनेट मिथील (१० ग्रॅम) किंवा प्रॉपिनेब (२० ग्रॅम) प्रती १० लिटर पाणी झाडावर फवारावे.