शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीत १७ जानेवारीपासून अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन

By admin | Updated: December 14, 2014 23:51 IST

गोविंद पानसरे : वैचारिक बंड नेहमी साहित्य निर्माण करते

सावंतवाडी : वैचारिक बंड हे नेहमी साहित्य निर्माण करीत असते. त्यामुळेच आम्ही विविध विषयांवर विचार मांडण्यासाठी हे साहित्य संमेलन आयोजित करीत असून या साहित्याचा लाभ सर्वत्र व्हावा, अशी अपेक्षा कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी व्यक्त केली. सावंतवाडीत १७ जानेवारीपासून अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी येथील श्रीराम वाचन मंदिरात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हरिहर आठलेकर, प्रा. प्रवीण बांदेकर, प्रा. गोविंद काजरेकर, अ‍ॅड. संदीप निंबाळकर उपस्थित होते.यावेळी पानसरे म्हणाले, आतापर्यंत राज्यात सहा ठिकाणी अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने साहित्य संमेलन आयोजित केले आहे. सावंतवाडीत होणारे हे सहावे साहित्य संमेलन असून, या संमेलनात जास्तीत जास्त साहित्यिक सहभाग नोंदविणार आहेत. अण्णा भाऊ हे श्रमिक कष्टकरी व तळागाळातील लोकांच्या वेदना मांडणारे चतुरस्त्र साहित्यिक होते. त्यामुळे या व्यासपीठावरून अनेक वैचारिक परिसंवाद होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.हे संमेलन १७ व १८ जानेवरीला येथील बॅ. नाथ पै सभागृहात होणार असून, या संमेलनाचे उद्घाटन ग्रंथदिंडीने होणार आहे. तसेच यावेळी गं्रथस्टॉल उभारले जाणार आहेत, तर संमेलनाचे अध्यक्षपद सतीश काळसेकर हे भूषविणार आहेत. उद्घाटन सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर असून, डॉ. राजन गवस, पत्रकार किरण ठाकूर, माजी आमदार जयानंद मठकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, आनंद मेणसे उपस्थित राहणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.दुसऱ्या दिवशी परिसंवाद आयोजित करण्यात आला असून, यामध्ये मोठमोठ्या वक्त्यांना बोलवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या महोत्सवाच्या निमित्ताने सावंतवाडीत ४०० ते ५०० साहित्यिक येणार असल्याचेही पानसरे यांनी स्पष्ट केले. तसेच या साहित्य संमेलनातून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा घडवून आणण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)