शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

आंगणेवाडी यात्रोत्सवाची लगबग सुरू

By admin | Updated: February 3, 2015 23:55 IST

शेवटचे दोन दिवस : रांग व्यवस्था, मंडप उभारणीला वेग

चौके : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीचा वार्षिक यात्रोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. शनिवार ७ फेब्रुवारीपासून या यात्रोत्सवाला सुरूवात होणार असून रविवारी सायंकाळी यात्रोत्सवाची समाप्ती होणार आहे. त्यामुळे आंगणे कुटुंबीय, यात्रा नियोजन समिती आणि सर्व प्रशासकीय यंत्रणांची यात्रा व्यवस्थापनासाठी लगबग सुरू झाली आहे. यावर्षी सात रांगांमधून देवीचे दर्शन व ओट्या भरण्यास मिळणार आहेत. त्यासाठी मंदिर परिसरातील मंडप उभारणी, रांगांसाठीचे पूल, आंगणे कुटुंबीयांची कंट्रोल केबीन उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.यावर्षी अंदाजे १२ लाख भाविक दर्शनासाठी येणार असल्याचा अंदाज आंगणे कुटुंबीयांतर्फे नरेश आंगणे व मुंबई मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आंगणेवाडीतील तरूण मंडळी आणि इतर सर्वजण व्यवस्थापन करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. भाविकांना लवकरात लवकर भराडी मातेचे दर्शन मिळाल्याबाबत आंगणे कुटुंबीयांनी नियोजन केले आहे. दर्शन रांगांमध्ये भाविकांना त्रास होऊ नये यासाठी स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. दर्शन रांगेतून मंदिरामध्ये येणारा आडवा पूल मंदिरापासून मागे घेण्यात आला असून मंदिराचे सौंदर्य वाढेल याची दक्षता घेण्यात येत आहे. यात चार मोठे व चार लहान अशा एकूण आठ मंडपांची उभारणी होणार आहे.भाविकांना धुळीचा त्रास होऊ नये म्हणून मंदिराभोवती हिरवे कार्पेट पसरविण्यात येणार आहे. यावर्षी मंदिराच्या गाभाऱ्यातील, मंदिर परिसरातील आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची आरास खास आकर्षण ठरणार आहे. त्याचप्रमाणे मंदिराशेजारी मुख्य व्यासपीठावर आंगणे कुटुंबीयांची कंट्रोल केबीन असणार आहे. रस्त्यानजिक महसूल व पोलीस प्रशासनाची अद्ययावत कंट्रोल केबीन असणार आहे. या ठिकाणांहून यात्रेकरू भाविकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.आंगणेवाडी यात्रोत्सवात हॉटेल्स, खेळण्यांची दुकाने, मिठाईची दुकाने यांसारखी शेकडो दुकाने थाटली जातात. त्या दुकानदारांनीही आपली दुकाने उभारण्यास सुरूवात केली आहे. मसुरे ग्रामपंचायतीने यात्रोत्सवातील पाणीपुरवठ्याकडे विशेष लक्ष देऊन पाणी शुद्धीकरण मोहिम पूर्ण केली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते डागडुजी आणि खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. भाविकांच्या स्वागतासाठी आंगणे कुटुंबीय आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. (वार्ताहर)