शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
3
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
4
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
5
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
6
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
7
किम जोंग-पुतीन भेटीत ग्लास, ठशांचं रहस्य! ‘सीक्रेट’ कायम सीक्रेटच राहू द्यावं
8
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
9
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
10
विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!
11
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
12
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
13
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
14
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
15
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
16
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
17
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
18
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
19
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
20
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन

संयुक्त पंचनाम्यासह होणार सुधारित याद्या

By admin | Updated: December 30, 2015 00:33 IST

शासनाचे आदेश : आंबा, काजू भरपाईसाठी करावी लागणार प्रतीक्षा ?

प्रकाश काळे-- वैभववाडी  -कोकणातील शेतकऱ्यांना आंबा, काजू नुकसानभरपाई हमीपत्रावर देण्यासाठी सामायिक क्षेत्रातील लागवड कोणाची आहे. याबाबत खात्री करुन संयुक्त पंचनाम्यासह आपद्ग्रस्त शेतकऱ्यांची सुधारित यादी तयार करण्याचे आदेश राज्य शासनाने प्रशासनाला दिले आहेत. त्याचप्रमाणे वाद असतील तिथे संमतीपत्रासह भविष्यात वाद उत्पन्न झाल्यास घेतलेली मदत शासनाला परत करण्यासंबंधी बंधपत्र घेऊनच नुकसान भरपाईचे वाटप करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे संमतीपत्रावर नुकसानभरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी भरपाई पदरात पडण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.फेब्रुवारी, मार्च २0१५मध्ये गारपीट, हवामानातील बदल व अवकाळी पावसामुळे आंबा, काजूपिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्या अनुषंगाने राज्य शासनाने आपद्गस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेत भरपाई वाटपाची जबाबदारी महसूलकडे सोपवली होती. मात्र, महसूलने हिस्सेदारांच्या संमतीखेरीज भरपाई देण्यास नकार दिल्याने कोकणातील बहुसंख्य शेतकरी भरपाईपासून वंचित राहिले. त्यामुळे नुकसानभरपाईचा निधीही पडून राहिला. याबाबत कोकणातील आमदारांनी हमीपत्रावर भरपाई वाटण्याची शासनाकडे मागणी लावून धरल्याने कोकण विभागासाठी नुकसान भरपाईचा स्वतंत्र शासन निर्णय काढून दिलासा दिला. मात्र, नव्या शासन निर्णयातील अटी शर्थीची पूर्तता करण्यात आणखी दोन महिने लोटणार असल्याचे दिसून येत आहे.नव्या शासन नियमानुसार पूर्वी नुकसानाचा पंचनामा केलेल्या लागवडी नेमक्या कोणी केल्या आहेत. त्याची खात्री करून तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, सरपंच व लगतच्या वहिवाटदारांच्या स्वाक्षरीने आपद्गस्त कसवटदारांची सुधारित यादी तयार केली जाणार आहे.तयार केलेल्या या याद्यांचे त्या त्या ठिकाणच्या ग्रामसभेत वाचन करुन ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करून त्यावर १५ दिवसात येणाऱ्या हरकतींच्या निर्गतीचे अधिकार महसूल मंडल अधिकारी, मंडल कृषी अधिकारी यांच्या समितीला देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)सुधारित याद्यांसाठी हालचालीसंमतीपत्राच्या अटीमुळे मे २0१५ मध्ये महसूलकडे प्राप्त झालेला आंबा, काजू नुकसान भरपाईचा निधी पडून आहे. त्यामुळे नव्या शासन निर्णयानुसार आपद्गस्त शेतकऱ्यांच्या सुधारित याद्या तयार करण्यास विलंब होऊन मार्च अखेरीस निधी मागे जाऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून महसूलने संबंधिताना कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवकांना संयुक्त पंचनाम्यासह सुधारित याद्या तातडीने बनविण्याच्या सूचना दिल्या आहेत.दोन महिन्यांची प्रतीक्षासमितीने हरकतींवर सुनावणी घेऊन उपलब्ध कागदपत्र व पंचनाम्याचा अभ्यास करून निर्णय घ्यावा. हिस्सेदारांच्या हरकती असतील तेथे संमतीपत्र बंधनकारक केले आहे. भविष्यात नुकसानभरपाईबाबत हिस्सेदारांमध्ये वाद निर्माण झाला तर भरपाईची रक्कम परत करण्याचे बंदपत्र घेऊनच भरपाईचे वाटप होणार आहे. भरपाई देण्याचा सुधारित निर्णय झाला असला तरी मदत पदरात पाडून घेण्यासाठी किमान दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.