शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी पर्यटनात फुलपाखरांनी बहरली आंबोली

By admin | Updated: January 2, 2016 08:28 IST

आंबोली येथे हिवाळी पर्यटनात फुलपाखरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, पर्यटकांच्या आनंदात यामुळे भर पडली आहे.

आंबोली : आंबोलीच्या डोंगररांगामध्ये सध्या भिरभिरणाऱ्या फुलपाखरांनी हिवाळी पर्यटनात आनंद निर्माण केला आहे. पावसाळा संपला की, फुलपाखरांच्या मिलनाचा काळ सुरू होत असून, या निमित्तानेच येथे मोठ्या संख्येने फुलपाखरे भिरभिरत आहेत. आंबोलीतील जैवविविधता प्रसिद्ध आहे. त्यातील सुंदर असा घटक म्हणजे फुलपाखरू. सध्या आंबोलीतील वनांमध्ये या फुलपाखरांची मोठी मांदियाळी दिसून येत आहे. यामुळे नैसर्गिक हिरवाईच्या कुशीत या फुलपाखरांना पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. काही फुलपाखरे स्थलांतरित होऊन येतात. अगदी हिमालयापासून ते परराज्यातही पावसाळा संपला की फुलपाखरांच्या मिलनाचा काळ सुरू होतो. हजारो, लाखोंच्या संख्येने कॉमन क्रॉ, ग्लॉसी टायगर, स्ट्राईप टायगर, ग्लास येलो अशा फुलपाखरांचे मार्गक्रमण आंबोलीमार्गे तळकोकण असे सुरू होते. याचा मुख्य स्रोत घारपी असल्याचे समजते. पाणथळ जागा, मोठ्या प्रमाणावरील फुलझाडे, ओढे यांच्या शेजारी ही फुलपाखरे मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याचे फुलपाखरू अभ्यासक शुभम आळवे यांनी सांगितले. याशिवाय आंबोलीत महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉरमॉन मोठ्या प्रमाणावर आढळते. भारतातील सर्वांत मोठा फुलपाखरू सोईन बर्डविंग हे फुलपाखरूही आंबोलीत आढळते. अशा प्रकारची २५० प्रकारची फुलपाखरे आंबोलीत सापडतात. यात क्रुझर, ब्ल्यू बोटल, मॅप, गोल्डन अ‍ॅगल, लेमन चॉकलेट, पेन्सी, लेमन पेन्सी या प्रकारच्या फुलपाखरांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होतो. आंबोलीतील जैवविविधता इतिहासकाळापासून प्रसिद्ध आहे. नैसर्गिक सुंदरतेतील मनमोहक असा घटक म्हणून फुलपाखराला ओळखले जाते. फुलपाखरांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. या पर्यटकांच्या आनंदात भर घालणारा असा फुलपाखरांचा महोत्सव पुढच्या वर्षी आंबोलीत होणार आहे. त्यानिमित्ताने पर्यटनपे्रमींनी आतापासून या महोत्सवाची तयारी केली आहे. (वार्ताहर)