शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आंबोलीतील पर्यटनस्थळांना ‘बुरे दिना’ची झालर

By admin | Updated: January 2, 2016 08:29 IST

विकासकामांत साधले जातेय ‘हित’ : स्थानिक केवळ ‘बघेच’; प्रशासन, लोकप्रतिनिधींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

आंबोली : थंड हवेचे रमणीय ठिकाण असूनही केवळ अपुऱ्या सोयीसुविधा व पर्यटकांसाठी नसलेले मनोरंजन यामुळे आंबोलीतील पर्यटनाला मर्यादा येत आहेत. हिवाळी पर्यटनासह ख्रिसमसच्या निमित्ताने सिंधुदुर्गसह गोवा राज्यात जाणाऱ्या लाखो पर्यटकांपैकी नाममात्र पर्यटकच आंबोलीत डोकावत आहेत. त्यामुुळे आंबोलीच्या पर्यटनाला अच्छे दिनाऐवजी दिवसेंदिवस ‘बुरे दिना’ची झालर चढत आहे. आंबोलीत हिरण्यकेशी नदीचा उगम, महादेवगड पॉर्इंट, नांगरतास धबधबा, राघवेश्वर स्वयंभू गणपती मंदिर, कावळेशेत पॉर्इंट, धबधबा, शिरगावकर पॉर्इंट यासारखी पर्यटनस्थळे आहेत. सुरुवातीच्या काळात या पर्यटनस्थळांना राज्यातील पर्यटकांसह देशातील पर्यटकांनी चांगलीच पसंती दिली होती. नैसर्गिक सौंदर्य आणि रमणीय वातावरण यामुळे आंबोलीच्या पर्यटनाची चांगलीच भुरळ पर्यटकांना पडली होती. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायही तेजीत येऊन स्थानिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न दूर झाला होता. सध्या या पर्यटनस्थळांवरील अनेक सुविधांच्या बाबतीत वानवा आहे. त्यामुळे येथील पर्यटकांना या स्थळांची गोडी कमी होत असून पर्यटक नाराजीने माघारी फिरत आहेत. स्थानिक व्यावसायिकांना याचा फटका बसत आहे. शासनाकडून या स्थळांच्या सुधारणेसाठी विविध विकास निधी दिला जातो; पण यातून निर्माण होणारी कामे विकास करण्यापेक्षा भकास होत आहेत. कोणतेही पर्यटन विकासाचे काम सुमार दर्जाचे होत असताना या व्यावसायिकांकडून ते काम कोणते आहे किंवा या कामाचा खरोखर पर्यटनाला काही फायदा होतो का? याबाबतची साधी विचारणाही केली जात नाही. स्थानिकांच्या केवळ बघ्याच्या भूमिकेनेच ठेकेदार व काही अधिकारी आपले यातून ‘हित’ साधून घेतात. त्यामुळे या पर्यटन स्थळांचा विकास रखडलेल्या अवस्थेतच आहे. याशिवाय आंबोलीत अद्यापही एकही सार्वजनिक शौचालय पर्यटकांसाठी उपलब्ध नाही. तीन पर्यटन स्थळे वगळता इतर पर्यटन स्थळांवर रस्त्याअभावी साधे जाता सुद्धा येत नाही. त्यामुळे काय आहे आंबोलीत, असा प्रश्न विचारत पर्यटक आंबोलीतून काढता पाय घेत आहेत. आंबोलीच्या पर्यटनाचे चांगले दिवस येण्याऐवजी दिवसेंदिवस वाईट दिवस येत असून स्थानिक पर्यटन व्यावसायिक, लोक प्रतिनिधी व पर्यटन महामंडळ यांच्या उदासिनतेमुळे आंबोलीची ही अवस्था झाल्याचे बोलले जात आहेत. स्थानिकांच्या मतानुसार आंबोलीत होणारी पर्यटन विकासकामे ही लोकप्रतिनिधी आणि संबंधित ठेकेदार यांच्या हितासाठीच होत असल्याचे आरोपही होत आहे.