शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
4
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
5
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
6
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
7
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
8
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
9
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
10
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
11
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
12
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
13
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
14
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
15
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
16
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
17
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
18
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
19
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
20
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या संचालकांचे आडमुठे धोरण उमेश गाळवणकर यांचा आरोप

By admin | Updated: September 5, 2014 23:25 IST

कोकणी जनतेच्या प्राणाची आहुती देण्याची वेळ येईल, असे वाटले नव्हते.

सावंतवाडी : कोकण रेल्वेचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक भानू तायल यांच्या आडमुठ्या धोरणामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत, असा आरोप के. आर. सी एम्प्लॉईज युनिटचे उपाध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी केला.कोकण रेल्वेचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक भानू तायल यांनी कोकण रेल्वेला नवरत्न पुरस्कार मिळविण्यासाठी डागडुजीवर खर्च न करता रेल्वे चालवली असे सिद्ध करण्याच्या जिद्दीपोटी कोकण रेल्वेच्या प्रवाशांना वेठीस धरु नये. तसेच त्यांच्या प्राणाची बाजी लावू नये व त्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, असे मला सांगावेसे वाटते. भानू तायल ही व्यक्ती कोकण रेल्वेसारख्या जागतिक प्रकल्पाच्या चेअरमनपदी नियुक्त केली जाते. त्या नियुक्तीचीच सीबीआय चौकशी करणे आवश्यक आहे. ही व्यक्ती स्वत:च्या महत्वाकांक्षेसाठी संपूर्ण कोकण रेल्वेस वेठीस धरते. मनमानी पद्धतीने वागते व प्रवाशांचे जीव धोक्यात घालणारे निर्णय घेते. या निर्णयाविरोधात राजकीय नेतृत्वाने चौकशीची मागणी करुन आंदोलनाचा पवित्रा घेतला पाहिजे व महाराष्ट्राच्या सर्व खासदारांनी संसदेत आवाज उठवून कोकण रेल्वेला न्याय दिला पाहिजे. कोकणातील सामान्य जनतेला दळणवळणाचे साधन म्हणून कोकण रेल्वे उभारण्यात आली. पण याच कोकणी जनतेच्या प्राणाची आहुती देण्याची वेळ येईल, असे वाटले नव्हते.दिवा पॅसेंजरच्या अपघातानंतर मुख्य सुरक्षा आयुक्तांनी रेल्वेची डागडुजी योग्यप्रकारे होत नाही. कारण त्यासाठी आवश्यक असणारा पुरेसा कामगार वर्ग कोकण रेल्वेकडे नाही आणि डागडुजीसाठी आवश्यक वेळही कोकण रेल्वेकडे नाही. या सर्वाला कोकण रेल्वेचे मुख्यालय जबाबदार आहे, असे स्पष्ट नमूद केलेले असताना गांभीर्याने दखल घेतली जात नाही. कोकणरेल्वेला अपघात होऊ नये, याकरिता उपाययोजना करुन प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करुन रेल्वेमंत्र्यांना खुश करण्यापेक्षा अपघात न होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. गाड्या कमीतकमी विलंबाने धावण्यासाठी प्रयत्नशील असणे, तसेच निर्धोक वाहतुकीसाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे, अशी मागणी गाळवणकर यांनी केली आहे. मात्र, तसे होताना दिसत नसल्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे. (वार्ताहर)