शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा नियोजनची सर्व रक्कम खर्च करणार

By admin | Updated: March 22, 2016 00:03 IST

१२६ कोटी प्राप्त : जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा विकासासाठी जिल्हा नियोजनअंतर्गत एप्रिल २०१५ मध्ये १२६ कोटी ५० लाख रुपये मिळाले असून, ही सर्व रक्कम खर्च होईल, असा विश्वास जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी चालू सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी शासनाने जिल्हा नियोजन विकासअंतर्गत १२५ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला होता. मात्र, शासनाने प्रत्यक्ष दीड कोटी रुपये वाढवून एप्रिल २०१५ मध्येच १२६ कोटी ५० लाख रुपये एवढी रक्कम सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केली असून, ही सर्व रक्कम प्राप्त झाली आहे. ही सर्व रक्कम मार्चअखेरपर्यंत १०० टक्के खर्च होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)यूपीएससी, एमपीएससीचे क्लास सुरू करणारसिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांची बुद्धिमत्तेची पातळी खूप आहे. याठिकाणी गुणवत्ताही मोठ्या प्रमाणात आहे. इयत्ता दहावी व बारावी या परीक्षांचे निकाल राज्यात सर्वांत जास्त प्रमाणात लागत असतात. मात्र, एवढी बुद्धिमत्ता असतानाही येथील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये टिकत नाहीत. एमपीएससी, यूपीएससी अशा परीक्षांमध्येही येथील युवकांचा टिकाव लागत नाही. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्यातील युवकांना या परीक्षांचे मार्गदर्शन व्हावे, यासाठी यूपीएससी आणि एमपीएससी या परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये क्लास सुरू करण्याचे निश्चित केले आहे. यासाठी सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर सावंतवाडी येथे यावर्षी क्लास सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये हे क्लासेस सुरू करण्यात येणार असून, यासाठी जिल्हा नियोजनमधून निधीची व्यवस्था करण्यात येणार आहे. \ग्रंथालयांना पुस्तकांसाठी दहा लाखतालुकास्तरावरील प्रत्येकी एका शासनमान्य ग्रंथालयास एमपीएससी व यूपीएससीची पुस्तके पुरविणार आहेत. असा प्रस्ताव जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीया गोखले यांनी तयार केला असून, यासाठी दहा लाखांच्या निधीची तरतूद केल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात यांनी दिली.