दापोली : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी आज, शनिवारी अंतिम पाच जणांची मुलाखत होणार आहे. त्यामुळे ११ महिन्यांनी विद्यापीठाला हक्काचा कुलगुरू मिळण्याची शक्यता आहे. डॉ. उत्तमकुमार महाडकर, डॉ. किरण कोकाटे, डॉ. बोरकर या मराठी चेहऱ्यांचाही यामध्ये समावेश असून, कुलगुरूपदी मराठी चेहऱ्याची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.तत्कालीन कुलगुरू डॉ. किसन लवांडे गेल्या डिसेंबर महिन्यात निवृत्त झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते; मात्र त्यावेळेच्या निकषांमुळे पात्र उमेदवार न मिळाल्याने निवड समितीने भरती प्रक्रिया रद्द केली होती. त्यानंतर नव्या सरकारने कुलगुरूपदाचे निकष बदलले. विद्यापीठाकडून हरकती मागवून कुलगुरूपदासाठीची पात्रता ठरविण्यात आली. नव्या पात्रतेनुसार निवड समितीने मुलाखती घेऊन अंतिम पाचजणांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली होती.यादरम्यान, डॉ. सुभानराव ढाणे यांनी या निवड प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका दाखल केल्याने कुलगुरूनिवड होणार की नाही याबद्दल उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. मात्र, न्यायालयाने याचिका दाखल करून घेताना सध्याच्या प्रक्रियेला स्थगिती न दिल्यामुळे ही प्रक्रिया पुढे सुरू राहिली आहे. त्यानुसार राज्यपालांनी आता मुलाखती घेण्याचे ठरविले आहे. शनिवारी या मुलाखती होत आहेत. या मुलाखतीमध्ये डॉ. उत्तमकुमार महाडकर, डॉ. किरण कोकाटे, डॉ. भट्टाचार्य, डॉ. शेट्टी, डॉ. बोरकर या पाच शास्त्रज्ञांचा समावेश आहे. या पाच सदस्यांच्या मुलाखती राज्यपाल घेणार असून, आज, शनिवारी उशिरा किंवा १ नोव्हेंबरला दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंची अधिकृत घोषणा राज्यपाल भवनातून होण्याची शक्यता आहे.दापोली कोकण कृषी विद्यापीठाला गेले अनेक महिने हक्काचा कुलगुरूनव्हता. कुलगुरूनसल्यामुळे अनेक कामे रेंगाळली होती; परंतु आता दापोली कृषी विद्यापीठाला हक्काचा कुलगुरूमिळणार असल्याने विद्यापीठाच्या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंची आज निवड?
By admin | Updated: October 30, 2015 23:29 IST