शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

आंबोली दरीत पडलेल्या एका तरुणाचा मृतदेह काढण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 22:56 IST

सावंतवाडी, दि. 4 - आंबोलीतील कावळेसाद पॉर्इंट येथील खोल दरीत पडलेल्या दोघा युवकांपैकी एका युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात सांगेली ...

सावंतवाडी, दि. 4 - आंबोलीतील कावळेसाद पॉर्इंट येथील खोल दरीत पडलेल्या दोघा युवकांपैकी एका युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात सांगेली व आंबोली येथील शोध पथकाला तब्बल पाचव्या दिवशी यश आले आहे. बाहेर काढण्यात आलेला मृतदेह प्रताप अण्णासाहेब उजगरे (२४ रा.हुनगीखुर्द जि.बीड)यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर शनिवारी सहाव्या दिवशी एनडीआरएफचे पथक आंबोली येथे येणार असून, ते इम्रान गारदी याचा शोध घेणार आहेत.सोमवारी सायंकाळी गडहिंग्लज येथील पोल्ट्रीत काम करणारे सात जण आंबोली-कावळेसाद येथे फिरायला आले होते. त्यातील दोघे जण मद्यधुंद अवस्थेत मौजमजा करीत असताना खोल दरीत कोसळले. त्यानंतर चार दिवस कोल्हापूर व आंबोलीसह सांगेली येथील शोध पथके या युवकांचा शोध घेत होती. पण त्यांना यश येत नव्हते. त्यातच गुरूवारी सायंकाळी कोल्हापूर येथील शोधपथक निघून गेले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी सांगेली येथील बाबल आल्मेडा व आंबोलीतील किरण नार्वेकर यांनी शोधमोहीम सुरू केली होती. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास प्रताप उजगरे याचा मृतदेह खोल दरीच्या पायथ्याला असल्याचा दिसला. त्या मृतदेहा पर्यत किरण नार्वेकर व दाजी माळकर पोचले त्यांनी या मृतदेहाला रोप वेच्या साहय्याने बांधले त्यानंतर रोप वे वर ओढून घेण्यात आला  ३ वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह वर काढण्यात शोधपथकासह अन्य साथीदारांना यश आले.गडहिंग्लज येथील इम्रान गारदी याच्या मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न पथकाने घेतला. पण दाट धुके तसेच पावसाचा प्रवाह मोठा असल्याने त्यात अनेक अडचणी येत असल्याने ही शोधमोहीम सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास थांबविण्यात आली आहे. पुन्हा हे पथक शनिवारी शोध घेणार आहे. तर शनिवारी एनडीआरएफचे पथकही आंबोली-कावळेसाद येथे दाखल होणार असून, तेही या मृतदेहाचा शोध घेणार आहेत.