शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘राम’ नामाने आचरानगरी दुमदुमली

By admin | Updated: March 29, 2015 00:51 IST

रामेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी : शाही थाटात संस्थानचा रामजन्मोत्सव साजरा

आचरा : ऐन मध्यान्हाचा समय, भर दुपारचे १२ वाजले, उन्हाचे चटके पायांना बसत होते. सूर्य डोक्यावर आला होता. वातावरणातील उष्म्याच्या झळा वाढलेल्या... हरिदास बुवांचे कीर्तन रंगात आलेले.... आणि ऐतिहासिक रामेश्वर मंदिराच्या परिसरात तोफा दणाणल्या... मंगल वाद्ये वाजू लागली... बंदुकीच्या फैरी झडू लागल्या... रामेश्वर मंदिरात पाळणा हळूहळू खाली येवू लागला... आणि ‘जय जय रघुवीर समर्थ’ची ललकारी आसमंतात दुमदुमली. गुलाल, अक्षतांची उधळण सुरु झाली. शाही थाटात रामेश्वर मंदिरातील रामजन्म उत्सवाला प्रारंभ झाला. हा मंगलमय क्षण होता ‘राम जन्मोत्सवाचा’ या क्षणाची ‘याची देही याची डोळा’ साक्षात अनुभूती घेण्यासाठी हजारो भाविकांनी रामेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये तुफान गर्दी केली होती. सर्वत्र एकच आवाज गुंजत होता. ‘राम जन्मला गं सखी राम जन्मला...’ राम जन्मोत्सवाचा हा अनोखा दिमाखदार सोहळा संस्थानकालीन आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वराच्या मंदिरासह जिल्ह्याच्या विविध भागात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. या उत्सवाच्या मंगलदायी क्षणाची अनुभूती घेण्यासाठी मंदिराचा परिसर भाविकांनी ठिकठिकाणी गजबजून गेला. यानंतर श्री रामाच्या गुणगानात शाही संस्थांनी थाटात रामेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली. नंतर सुंठीवडा प्रसाद व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. राम जन्मावर विविध गीतगायन सादर करण्यात आले. सकाळपासून रामेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली होती. भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था आचरावासियांतर्फे करण्यात आली होती. विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या बहारदार गायकीने या उत्सवाला द्विगुणीत केले. सायंकाळी पुराणवाचन करण्यात आले. रात्री महापूजा, नेत्रदीपक पालखी सोहळा पार पडला. पालखी सोहळ्यानंतर व्यासबुवांचे कीर्तन झाले. मोठ्या उत्साहात रामनवमी उत्सव पार पडला. या उत्सवासाठी आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राची यंत्रणा व पोलीस यंत्रणेने सतर्कता बाळगली होती.(वार्ताहर)