शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल पाच दिवसांनी एक मृतदेह बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 22:55 IST

आंबोली : आंबोलीतील कावळेसाद पॉर्इंट येथील खोल दरीत पडलेल्या दोघा युवकांपैकी एका युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात सांगेली व आंबोली येथील शोध पथकाला तब्बल पाचव्या दिवशी यश आले आहे. बाहेर काढण्यात आलेला मृतदेह प्रताप अण्णासाहेब उजगरे (२४, रा. हुनगीखुर्द, जि. बीड) याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देमृतदेहाचे शवविच्छेदन आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले.प्रताप हा उजगरे असून राठोड या नावाने सर्वत्र चर्चेत आला होता.तक्रार ग्रामस्थांनी तहसीलदार सतीश कदम यांच्याकडे केली.

आंबोली : आंबोलीतील कावळेसाद पॉर्इंट येथील खोल दरीत पडलेल्या दोघा युवकांपैकी एका युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात सांगेली व आंबोली येथील शोध पथकाला तब्बल पाचव्या दिवशी यश आले आहे. बाहेर काढण्यात आलेला मृतदेह प्रताप अण्णासाहेब उजगरे (२४, रा. हुनगीखुर्द, जि. बीड) याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तर शनिवारी सहाव्या दिवशी एनडीआरएफचे पथक आंबोली येथे येणार असून, ते इम्रान गारदी याचा शोध घेणार आहेत.सोमवारी सायंकाळी गडहिंग्लज येथील पोल्ट्रीत काम करणारे सातजण आंबोली-कावळेसाद येथे फिरायला आले होते. त्यातील दोघेजण मद्यधुंद अवस्थेत मौजमजा करीत असताना खोल दरीत कोसळले. त्यानंतर चार दिवस कोल्हापूर व आंबोलीसह सांगेली येथील शोध पथके या युवकांचा शोध घेत होती. पण त्यांना यश येत नव्हते.

त्यातच गुरुवारी सायंकाळी कोल्हापूर येथील शोध पथक निघून गेले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी सांगेली येथील बाबल आल्मेडा व आंबोलीतील किरण नार्वेकर यांनी शोध मोहीम सुरू केली होती.दुपारी २ च्या सुमारास प्रताप उजगरे याचा मृतदेह खोल दरीच्या पायथ्याला असल्याचा दिसला. त्या मृतदेहापर्यंत किरण नार्वेकर व दाजी माळकर पोहोचले. त्यांनी मृतदेहाला रोपवेच्या साहाय्याने दुपारी ३च्या सुमारास वर काढले.

गडहिंग्लज येथील इम्रान गारदी याच्या मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न पथकाने केला. पण दाट धुके तसेच पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने त्यात अनेक अडचणी येत असल्याने ही शोधमोहीम सायंकाळी ४च्या सुमारास थांबविण्यात आली. पुन्हा हे पथक शनिवारी शोध घेणार आहे. दरम्यान, वर काढण्यात आलेल्या प्रताप उजगरे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

या शोध मोहिमेत बाबल अल्मेडा, किरण नार्वेकर, अभय किनळोस्कर, वामन नार्वेकर, पंढरीनाथ राऊळ, फिलिप अल्मेडा, संतान अल्मेडा, गुरुनाथ सावंत, संतोष नार्वेकर, सचिन नार्वेकर, सुमन राऊळ, बाबूराव कविटकर, अबीर आंचेकर, कृष्णा राऊळ, सुरेश राऊत, शंकर गावडे, अमरेश गावडे, दीपक मेस्त्री, आदी सहभागी झाले होते. तर आंबोली पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वास सावंत, कॉ. गुरुदास तेली, प्रकाश कदम, गजानन देसाई, कोलगोंडा आदींनी या पथकाला सहकार्य केले.कोल्हापूर येथील शोध पथकाबाबत संतापपाच दिवसानंतर प्रताप याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या दोघाही युवकांचे मृतदेह मंगळवारीच म्हणजे दुसºया दिवशी काढणे शक्य होते. कोल्हापूर येथील शोध पथकाला कोणीही बोलावले नाही; तरी ते आले. तसेच कोल्हापूरच्या पथकाने सांगेली व आंबोलीतील शोधकार्यात व्यक्तींशी संपर्क ठेवला नसल्यानेच पाच दिवस लागले, अशी तक्रार ग्रामस्थांनी तहसीलदार सतीश कदम यांच्याकडे केली.प्रतापचे आडनाव राठोड नसून उजगरेप्रताप हा खोल दरीत पडल्यानंतर त्याची पूर्ण माहिती कोणालाच नव्हती. पोल्ट्रीमालकाने त्याचे नाव प्रताप राठोड असेच पोलिसांना सांगितले होते. पण मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी प्रतापच्या नातेवाईकांडून संपूर्ण माहिती घेतल्यानंतर आडनाव राठोड नसून, उजगरे असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रताप हा उजगरे असून राठोड या नावाने सर्वत्र चर्चेत आला होता.