शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी तालुक्यातील शेतकऱ्यांना ९ कोटी २२ लाख रूपयांचे वाटप

By admin | Updated: December 31, 2015 00:25 IST

अवकाळी पाऊस : आंबा उत्पादकांना दिलासा

रत्नागिरी : गतवर्षी अवेळीच्या पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. जिल्ह्यातील ७ हजार ३५७ शेतकऱ्यांना ९ कोटी २२ लाख ५१ हजार ४११ रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये झालेल्या अवेळीच्या पावसामुळे ७० टक्क्यांपेक्षा अधिक पिकाचे नुकसान झाले होेते. पंचनाम्यानंतर शासनाकडून हेक्टरी २५ हजार रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना आंबा नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली. बाधीत सर्वेक्षणानुसार रत्नागिरी तालुक्यातील १० हजार ७७५ शेतकऱ्यांना १६ कोटी ८१ लाख ६१ हजार रुपये जाहीर करण्यात आले होते. पैकी ७ हजार ३५७ शेतकऱ्यांना ९ कोटी २२ लाख ५१ हजार ४११ रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.जिल्ह्यातील ३ हजार १२१ सिंगल सातबाराधारकांना ४ कोटी ८२ लाख ३२ हजार १७५ रुपये, तर ४ हजार १४५ खातेदारांना ४ कोटी ४० लाख १९ हजार २३६ रुपयांचे वितरण करण्यात आले. सामायिक खातेदारांसाठी हमीपत्राची अट आहे. हमीपत्रानुसार संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे.यामध्ये नोकरी - व्यवसायानिमित्त जिल्ह्याबाहेर असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सातबारावरील अधिक नावांमुळे सहहिस्सेदारांची संख्या वाढते. मिळणाऱ्या भरपाईच्या रकमेपेक्षा संमतीपत्र तसेच येण्या-जाण्याचा खर्च अधिक होतो. त्यामुळे अनेक शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात. वर्ष समाप्ती तसेच आर्थिक वर्ष समाप्ती जवळ असल्यामुळे नुकसान भरपाईचा निधी परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची रक्कम घेऊन जावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे. निधी परत जाण्यापूर्वी शेतकऱ्यांनी हमीपत्र तयार करून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)७ हजार ३५७ शेतकऱ्यांना मिळाला लाभ.फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे ७० टक्क्यांपेक्षा अधिक पिकाचे नुकसान.निधी परत जाण्यापूर्वी हमीपत्र तयार करून द्यावे; कृषी विभागाचे आवाहन.