शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

४३ विद्यार्थ्यांना हृदयविकार

By admin | Updated: August 13, 2014 23:39 IST

स्थायी समिती सभेत माहिती : आरोग्य विभागाकडून योग्य कार्यवाही सुरू

सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या आरोग्य तपासणी दरम्यान जिल्ह्यातील ७९ शालेय विद्यार्थी हे दुर्धर आजाराने पीडित असून त्यापैकी तब्बल ४३ विद्यार्थ्यांना हृदयविकार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली असून त्यांच्या शस्त्रक्रियेसाठीची पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेघर असणाऱ्या घरांची यादी तत्काळ तयार करा, असे आदेश जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदेश सावंत यांनी स्थायी समिती सभेत दिले.जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा सभाध्यक्ष जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, शिक्षण व आरोग्य सभापती प्रकाश कवठणकर, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, सदस्य सतीश सावंत, गुरूप्रसाद पेडणेकर, वंदना किनळेकर, मधुसूदन बांदिवडेकर, रेवती राणे, पुष्पा नेरूरकर, अधिकारी, खातेप्रमुख आदी उपस्थित होते.सभेच्या सुरूवातीला माजी राज्यमंत्री कै. बापूसाहेब प्रभूगावकर, सारस्वत बँकेचे अध्यक्ष कै. एकनाथ ठाकूर आणि माळीण गावातील दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सदस्या वंदना किनळेकर यांनी हा शोक प्रस्ताव मांडला. आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील तपासणी करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ७९ विद्यार्थी हे दुर्धर आजाराने पीडित असून त्यातील ४३ विद्यार्थ्यांना हृदयविकाराचा आजार जडला आहे. उर्वरित विद्यार्थी हे औषधोपचाराने बरे होणारे असून त्यातील ४३ हृदयविकाराने बाधीत विद्यार्थ्यांची कोल्हापूर व मुंबई येथील रूग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. एन. व्ही. सोडल यांनी दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्यापही बेघर कुटुंबे आहेत. अशा कुटुंबांचा सर्व्हे करा व बेघर कुटुंबांची यादी तयार करा व ती इंदिरा आवास योजनेच्या लाभासाठी परत पाठविण्यात यावी, अशी सूचना सदस्य सतीश सावंत यांनी मांडली व तसा निर्णयही घेण्यात आला. (प्रतिनिधी)१३व्या वित्त आयोगाचा पहिला टप्पा जिल्हा परिषदेला प्राप्त झाला असून त्या बदल्यात ६ कोटी ९७ लाख रूपये वित्त विभागाकडे जमा झाले आहेत. हा निधी शासन निकषानुसार वाटप करण्यात येणार असून विविध योजनेमध्ये खर्च होणार आहे. जिल्हा परिषद विभागाला ६९ लाख खर्च होणार आहे. पंचायत समिती स्तरावर १ कोटी ३९ लाख तर ग्रामपंचायत स्तरावर ४ कोटी ८८ लाख असा निधी वितरीत केला जाणार आहे. ग्रामीण भागात विद्युत पुरवठा खंडीत झाला किंवा त्याबाबत काही समस्या असल्या तर विद्युत कंपनीशी संपर्क साधला तर ही कंपनी टोल फ्री नंबरवर तक्रार नोंदवा, अशी उत्तरे देते. याबाबत संदेश सावंत व सतीश सावंत यांनी प्रश्न उपस्थित करीत वीज अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत ग्राहकांना तक्रार द्यायची असेल तर पूर्वीप्रमाणेच कार्यालयातच तक्रार नोंदवून घ्या, अशी सूचना केली.