शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत १७७ प्रकरणे निकाली

By admin | Updated: December 14, 2014 23:53 IST

लोकअदालत : ४४ लाख २९ हजार ५४६ रुपयांची तडजोड

कणकवली : येथील दिवाणी न्यायालयात आयोजित लोकअदालतीमध्ये आलेल्या १२३९ वादपूर्व प्रकरणांपैकी १६२ आणि न्यायालयात दाखल १३४ पैकी १५ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली, तर एकूण ४४ लाख २९ हजार ५४६ रुपयांची तडजोड झाली. कणकवली न्यायालयाच्या न्यायाधीश सोनिया कानशिडे यांनी कणकवली येथे घेण्यात आलेल्या लोकअदालत कार्यक्रमात मार्गदर्शन केले. या लोकअदालतीमध्ये बॅँक प्रकरणातील ४२९ वादपूर्व प्रकरणे होती. त्यापैकी ६२ प्रकरणे निकाली निघाली. त्यात ४० लाख ४२ हजार ६७८ रुपयांची तडजोड झाली.वीज वितरणची १५१ पैकी १८ प्रकरणे निकाली झाली. त्यात २ लाख ५० हजार ४४ रुपयांची तडजोड झाली. बीएसएनएलसंबंधी ६२३ प्रकरणांपैकी ६२ प्रकरणे निकाली झाली. त्यात १ लाख ३६ हजार ८२४ रुपयांची तडजोड झाली. एकूण सहा पॅनेल या अदालतीमध्ये नेमण्यात आली होती. सरकारी वकील एन. एन. कुलकर्णी, डी. पी. तानवडे, राजेंद्र सावंत, जागृती शेटये, प्रशिक्षणार्थी सहायक गटविकास अधिकारी उत्कर्ष वागरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुहास कोरेगावे, दिवाकर कोरगावकर, शोभा ढवळ, मारुती जाधव, प्रदीप वारंग, दादा कुडतरकर यांचा पॅनेलमध्ये पंच म्हणून समावेश होता. पोेलीस प्रकरणांसाठी कणकवलीचे पोलीस निरीक्षक मनोहर रानमाळे, वैभववाडीचे निरीक्षक बर्वे यांनी काम पाहिले. सहायक अधीक्षक यु. आर. कारेकर, एन. पी. मठकर, वरिष्ठ लिपिक एम. आर. काणेकर यांच्यासह न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांनी लोकअदालत यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)३६ पैकी २0 प्रकरणे निकालीवैभववाडी व कणकवली पोलिसांकडील ३६ अदखलपात्र प्रकरणांपैकी २० प्रकरणे निकाली झाली. चेक बाऊन्सच्या ७५ पैकी ६ प्रकरणांत निकाल झाला. पोटगीची १०, दिवाणी २० आणि इतर दिवाणी २० पैकी एकाही प्रकरणात निकाल झाला नाही. बॉम्बे पोलीस अ‍ॅक्ट आणि मोटर व्हेईकल अ‍ॅक्टमधील ९ प्रकरणांत दंड वसूल झाल्यामुळे सर्व प्रकरणे निकाली झाल्याची माहिती देण्यात आली.