शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

आपली भेट, पुढच्या निवडणुकीत थेट!

By admin | Updated: October 13, 2014 23:06 IST

ऐका दाजिबा..

‘हुश्श! सुटलो बुवा एकदाचं. महिनाभर प्रचार करून-करून पिट्टा पडला. एवढी इलिक्शानं झाली पन् यंदाचं इलिक्शान करवंदाच्या जाळीसारखं गुतागुतीचं आन् नेत्यांच्या इभ्रतीचं झालं! म्हंजी म्होरं सोन्याची अंडी देणारी कोंबडी दिसावी आन् तिला पकडायला आख्ख्या गावानं तिच्यामागणं गल्लीबोळातनं पळावं, आसं सगळीकडं दिसत हुतं!’ पारावर रंगलेल्या बैठकीत सुस्कारा सोडत शिरपा व्यक्त झाला.‘तर हो, लोकांनी वाहत्या गंगेत ‘हात’ धुतलाय तर उमीदवारांचं आख्खं ‘घोडं’ गंगेत न्हाणार हाय! इरोधकांचा भाषणात खरपूस समाचार घेण्यापास्नं ते टोला लगावण्यापर्यंत यंदा मजल गेली. उणीदुणी निघाली, एकमेकांना उघडं पाडलं, खाजगी गोष्टी चव्हाट्यावर मांडल्या गेल्या, पैशाचा तर महापूर आला! ‘चौदाव्या रत्ना’साठी ह्यो सारा खेळ मांडलाया बगा!’ आता जनता ‘चौदावं रत्न’ म्हणून कुणाला जन्माला घालणार आन् कुणाला ‘चौदावं रत्न’ दावणार, हे १९ तारखेला समजलंच.’ नारूनं सगळा वृत्तांत सांगितला. दाजिबा दिसंना कुठं ? आता तर प्रचारबी संपलाय. कुठं गायब झाला म्हणायचा?’ पारावर बसलेल्या सगळ्यांनी आठवण निघाली.‘मंडळी, ह्या इलिक्शानात तसं बरंच काय गायब झालंय! सगळं चव्हाट्यावर आलं; पन् ते सगळं राजकारण्यांच्या सोयीचं, जनतेच्या सोयीचं गायब केलं! ‘महाराष्ट्र देशात सगळ्यात पुढं आसंल’ असं सांगणारे महाराष्ट्रातलं उद्योगधंदं आन् म्हत्वाची सरकारी हाफिसं गुजरातला पळवत असल्याचं जसं त्यांच्या जाहीरनाम्यातनं गायब झालं; तसंच मंडळी ‘दाजिबा’ आता गायब झालाय. परत्येक पक्षानं आपल्या जाहीरनाम्यात जनतेला विकासाचं गाजर दावलंय खरं; पण निवडून आल्यावर जनतेला ‘टाटा’ करून जाणारं नेतं थेट पुढच्या निवडणुकीलाच दर्शन देणार, हे जसं ठरल्यालं हाय, तसंच पुढच्या निवडणुकीतच आता ‘दाजिबा’चं दर्शन आपल्याला व्हणार आहे.’ नारूचं खोचक आणि सूचक बोल ऐकून अख्खा पार शून्यात गेला.प्रदीप यादव