शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
2
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
3
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
6
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
9
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
10
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
11
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
12
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
13
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
14
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
15
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
16
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
17
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
18
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
19
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
20
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

‘स्वाभिमानी’च्या युवा जिल्हाध्यक्षास मारहाण

By admin | Updated: June 22, 2014 00:17 IST

गंभीर जखमी : पतंगरावांच्या निवासस्थानावर दगडफेक

पलूस/भिलवडी : पलूस पंचायत समितीच्या आमसभेत उसाला एफआरपीप्रमाणे दर देण्याच्या ठरावाबाबत प्रश्न उपस्थित केल्याच्या कारणावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांत खडाजंगी झाली. त्यातूनच पंचायत समिती सदस्य व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप राजोबा यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार पालकमंत्री पतंगराव कदम यांच्यासमोरच घडला. मारहाणीत राजोबा जखमी झाले आहेत. यानंतर स्वाभिमानीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सांगलीत मंत्री पतंगराव कदम यांच्या निवासस्थानावर दगडफेक केली.पलूस पंचायत समितीची आमसभा पालकमंत्री कदम यांच्या अध्यक्षतेखाली आज, शनिवार सकाळी साडेअकराला पंचायत समितीच्या आवारात सुरू झाली. यावेळी व्यासपीठावर युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम उपस्थित होते. सहा वर्षांनंतर आमसभा होत असल्याने काँग्रेससह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही मोठ्यासंख्येने उपस्थित होते. प्रारंभीच तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केल्याबद्दल पालकमंत्री कदम यांच्या अभिनंदनाचा ठराव संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष श्रीकांत लाड यांनी मांडला. त्याला संदीप राजोबा यांनी अनुमोदनही दिले. त्यानंतर गटविकास अधिकारी रविकांत आडसूळ यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून दाखवला. याचवेळी संदीप राजोबा यांनी गेल्या उसाच्या एफआरपीबाबत करण्यात आलेल्या ठरावाचे काय झाले, असा सवाल करत मंचावर जात ध्वनिक्षेपक हातात घेतला. ही पंचायत समितीची आमसभा असून उसाच्या दराचा याठिकाणी संबंध नाही, असे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राजोबा यांना सुनावले. त्यातून वादावादी सुरू झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांत त्यावरून खडाजंगी सुरू झाली. त्यातूनच काहींनी राजोबा यांच्या दिशेने धाव घेऊन त्यांना मंचावरून खाली ओढले आणि मारहाणीस सुरुवात केली. या झटापटीत राजोबा जमिनीवर पडले. काही कार्यकर्त्यांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. केवळ दोन मिनिटात खुद्द पालकमंत्री कदम यांच्यासमोर घडलेल्या या प्रकाराने सारेच अवाक झाले. यावेळी कदम ध्वनिक्षेपकावरून कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करत होते.पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटकाव करत राजोबा यांना सभेबाहेर नेले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजोबा यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविले. केवळ पाऊण तासात आमसभा आटोपती घेण्यात आली. मारहाणीची बातमी काही वेळातच पलूस-कडेगाव तालुक्यांत पसरली. दुपारनंतर राजोबा यांच्या मारहाणीच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी पलूस शहर बंद केले. (वार्ताहर)ं