सातारा : राष्ट्रवादीकडून छत्रपतींच्या वंशजांची अवहेलना केली जात आहे. त्यामुळे खासदार उदयनराजेंनी स्वाभिमान दाखवून भाजपमध्ये यावं, असा सल्ला माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी दिला.साताऱ्यातील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. येळगावकर म्हणाले, ह्यराष्ट्रवादीकडून खासदार उदयनराजेंची आणि छत्रपतींच्या वंशजांची अवहेलना केली जात आहे. पुण्यातील बैठकीत त्यांना आठ दिवसांनी भेटायला या, असं सांगितलं जातं. हे पाहता उदयनराजेंनी आता स्वत:चा अपमान करून घेऊ नये. उदयनराजेंवर आता खऱ्या अर्थाने भूमिका जाहीर करण्याची वेळ आली आहे. त्यांनी स्वाभिमान दाखवून भाजपमध्ये पुन्हा यावे.उदयनराजेंना खरेच मोठे व्हायचे असेल तर त्यांनी थोडे बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, असे सांगून डॉ. येळगावकर पुढे म्हणाले, त्यांच्याबरोबर असलेली एक व्यक्ती चुकीचे वातावरण निर्माण करीत आहे. त्या व्यक्तीला आता हाकलून दिले पाहिजे. जवळचा मित्र म्हणून त्यांना हा एक सल्ला देत आहे.माझ्याएवढी श्रद्धा व त्याग त्यांच्यासाठी कोणी केला नसेल. त्यांच्यासाठी माझी विधानसभेची निवडणूक सोडून साताऱ्यात आलेला मी माणूस आहे. आजपर्यंत त्यांचा इतरांनी खूप फायदा घेतला. मात्र, मी एक पैचा देखील फायदा घेतला नाही, असा दावाही यावेळी डॉ. येळगावकर यांनी केला.
स्वाभिमान दाखवून उदयनराजेंनी भाजपमध्ये यावं : येळगावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 17:52 IST
राष्ट्रवादीकडून छत्रपतींच्या वंशजांची अवहेलना केली जात आहे. त्यामुळे खासदार उदयनराजेंनी स्वाभिमान दाखवून भाजपमध्ये यावं, असा सल्ला माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी दिला.
स्वाभिमान दाखवून उदयनराजेंनी भाजपमध्ये यावं : येळगावकर
ठळक मुद्देस्वाभिमान दाखवून उदयनराजेंनी भाजपमध्ये यावं : येळगावकरआजपर्यंत त्यांचा इतरांनी खूप फायदा घेतला