शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

इतिहास लिहिताना क र्मवीरांना डोळ्यासमोर ठेवावे

By admin | Updated: September 22, 2015 23:31 IST

एन. डी. पाटील : गाडगे महाराज महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

कऱ्हाड : हस्तरेषा पाहून नशीब घडत नाही, तर तळहाताच्या पाठीमागे असणारे मनगट, मन आणि मेंदू यांच्या ताकदीवर नशीब घडविता येते. महाराष्ट्राचा चेहरामोहरा व मातीची कूस बदलण्याचे काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. महाराष्ट्राचा विसाव्या शतकाचा इतिहास लिहिताना कर्मवीरांना डोळ्यासमोर ठेवूनच लिहावा लागेल. त्यांनी ज्ञानाची गंगा शेतकऱ्यांच्या झोपडीपर्यंत नेण्याचे महान कार्य केले आहे. म्हणून हा समारंभ नसून या महामानवाने जे कष्ट उपासले, त्या कष्टकरी रयतेच्या राजाचा हा सन्मान आहे. शाहंूचा व महात्मा फुले यांचा वसा आणि वारसा चालविण्याचे काम कर्मवीरांनी केले. यातच त्यांचे मोठेपण सामावले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांनी केले.येथील रयत शिक्षण संस्थेच्या गाडगे महाराज महाविद्यालयात डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती व नवीन इमारतीचा उद्घाटन समारंभ भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील अध्यक्षस्थानी होते. अ‍ॅड. रवींद्र पवार, रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. गणेश ठाकूर, माधव मोहिते, पंचायत समिती उपासभापती विठ्ठलराव जाधव, अ‍ॅड. सदानंद चिंगळे, जितेंद्र डुबल, अतुल कदम, फत्तेसिंह जाधव, लालासाहेब पाटील, प्राचार्य डॉ. एस. टी. साळुंखे, प्राचार्य प्रतिभा गायकवाडी आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. पतंगराव कदम म्हणाले, ‘रयत शिक्षण संस्थेने व कर्मवीर अण्णांनी गरजेप्रमाणे शिक्षणाची सुधारणा केली. जिद्दीने व ताकदीने सर्व कार्य पूर्ण करण्याचे बळ दिले. माणूस हा परिवर्तनाचा केंद्रबिंदू मानून माणूस घडविण्याचे काम कर्मवीर अण्णांनी केले. त्यांनी एक नवा रस्ता निर्माण केला. जून २०१६ पासून महाविद्यालयाचा पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल सुरू करण्याचा मानस आहे.’ प्रेक्षागृहाला प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे नाव देण्याची घोषणा डॉ. कदम यांनी यावेळी केली. (प्रतिनिधी)नवीन अर्धपुतळ्यांचे अनावरणएक लाख चाळीस हजार स्क्वेअर फूट बांधकाम केलेल्या व सुमारे दहा कोटी खर्च झालेल्या १११ खोल्यांच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व ८२ खोल्यांच्या दोन कोटी ६२ लाख खर्चाच्या नूतन मुलांच्या वसहतिगृहाचे उद्घाटन व कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगे महाराज व दानशूर बंडो गोपाळा मुकादम यांच्या नवीन अर्धपुतळ्यांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले.