कऱ्हाड : सुपने (ता. कऱ्हाड) येथील पै. दाजी बाळा माळी (वय ९१) यांचे निधन झाले. कऱ्हाड तालुक्यातील शामगाव हे दाजी माळी यांचे मूळगाव होते. अनेक वर्षांपासून ते सुपने येथे स्थायिक होते. प्रसिद्ध मल्ल म्हणून त्यांची विभागात ओळख होती. १९६० ते ७० च्या दशकात त्यांचा कुस्ती क्षेत्रात मोठा दरारा होता. उत्तर भारतीय पैलवानांना चित्रपट करणारे पैलवान म्हणून त्यांची खास ओळख होती. १९६४ मध्ये हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांच्याबरोबर त्यांची झालेली लढत कुस्ती शौकिनांमध्ये आजही चर्चिली जाते. दिल्लीमध्ये झालेल्या अखिल भारतीय कुस्तीगीर परिषदेच्या सामन्यात दाजी माळी यांनी चांदीची गदा पटकावली होती. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो : ०४ दाजी माळी