शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ विस्ताराविरोधात श्रमिक मुक्ती दलाचा मोर्चा

By admin | Updated: July 7, 2015 22:18 IST

लोकशाही हक्कांना पायाखाली दाबणे आणि कायद्याच्या तरतुदीला बगल देणे, हे अन्यायकारक आणि लोकशाही प्रणालीला मारक आहे.

सातारा : कऱ्हाड येथील विमानतळ विस्ताराला विरोध करत श्रमिक मुक्ती दलातर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अनावश्यक विस्तार, अशास्त्रीय विस्तार टाळण्यासाठी पुनर्वसन प्राधिकरणासोबत बैठक आयोजित करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चामध्ये प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कऱ्हाड विमानतळ विस्ताराला विरोध करणारी आणि शास्त्रीय व कायद्यांमधील तरतुदींना सुसंगत पर्याय देणारी चळवळ २0११ पासून सुरु झाली. विमानतळ विस्तारिकरण हे पुनर्वसन अधिनियम १९९९, पुनर्वसन प्राधिकरणचे वेगवेगळे शासन निर्णय, राष्ट्रीय पुनर्वसन धोरण इत्यादीच्या आधारावर विचार केल्यास कायद्याच्या कक्षेत बसत नाही. भूसंपादनाच्या प्रत्येक कलमांच्या अंमलबजावणीवेळी बाधितांनी या पायावर आक्षेपही घेतले आहेत. पण या आक्षेपांना सुनावणी घेतली गेली नाही. तसेच उत्तरेही दिली नाहीत. आजही पूर्वीचे निर्णय काय आहेत, याची पर्वा न करता ‘आता विमानतळ विस्तार अंतीम झाला,’ अशा पध्दतीने संबंधित कार्यालयाचा व्यवहार सुरु आहे. अशा प्रकारे लोकशाही हक्कांना पायाखाली दाबणे आणि कायद्याच्या तरतुदीला बगल देणे, हे अन्यायकारक आणि लोकशाही प्रणालीला मारक आहे. याबाबत चर्चा घडवून येणे आवश्यक असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. साताऱ्यातील मोर्चामध्ये पंजाबराव पाटील, आनंदराव जमाले, जयसिंग गावडे, गोंविंदराव शिंदे, सिध्देश्वर पाटील आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)