शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांचा गोंधळ, सभासदांची पळापळ

By admin | Updated: September 29, 2014 23:58 IST

कृष्णेच्या सभेत गोंधळ : सात मिनिटांत सभा गुंडाळली; प्रवेशद्वारावर विरोधकांची प्रतिसभा

कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विरोधक आणि सत्ताधारी गटांच्या कार्यकर्त्यांमधील परस्पर विरोधी घोषणाबाजी, धक्काबुक्की, चप्पलफेक आणि हमरीतुमरीमुळे सभा अवघ्या सात मिनिटांत आटोपण्यात आली़ रेठरे बुद्रुक, ता़ कऱ्हाड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची सन २०१३-१४ च्या अधिमंडळाची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अविनाश मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती़ विद्यमान संचालक मंडळाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेणारे ८५ प्रश्न कारखाना विरोधी गटाचे नेते डॉ़ इंद्रजित मोहिते यांनी लेखी स्वरूपात विचारले होते़ अन् मोहिते गटाचे नेते आपल्या सभासद कार्यकर्त्यांसह या सभेला उपस्थित रहाणार होते़ त्यामुळे या सभेत गोंधळ होणार, अशी शक्यता परिसरातील लोकांमधून सुरू होती़ त्या दृष्टीने संचालक मंडळाने सभेसाठी कडक पोलीस बंदोबस्त व सुरक्षित बैैठकव्यवस्था केली होती़ दुपारी दीड सुमारास कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते सभामंचकावर उपस्थित झाले़ यावेळी व्यासपीठावर कारखान्याचे उपध्यक्ष सुरेश पाटील, पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठलराव जाधव, अशोकराव थोरात तसेच सर्व संचालक व विविध मान्यवर उपस्थित होते़ दुपारी दोन वाजता उपाध्यक्ष सुरेश पाटील उपस्थितांचे स्वागत करण्यासाठी व्यसपीठावर उभे राहिले, त्याच दरम्यान, डॉ़ इंद्रजित मोहिते व कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते़ आपल्या सभासद कार्यकर्त्यांसह सभास्थळी दाखल झाले़ घोषणाबाजी करत मोहिते गटाचे नेते व कार्यकर्ते सभामंडपात येत असताना गेटवरती पोलीस व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना आत जाण्यास अटकाव केला़ त्यामुळे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली़ लगेच सत्ताधारी व विरोधी गटाने आपापल्या नेत्यांच्या नावाने घोषणा सुरू केल्या़ यातच कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी, धक्काबुक्की सुरू झाली़ गोंधळ वाढतच गेल्याने सत्ताधारी गटाच्या एका कार्यकर्त्याने व्यासपीठावरून विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर-मंजूर म्हणून जाहीर करताच विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठाच्या दिशेने चप्पलफेक केली़ सभामंडपातील या गोंधळामुळे बसलेले सभासद जागा मिळेल, त्या दिशेने सैरभैर पळू लागले़ हो गोंधळ सुरू असतानाच कारखान्याचे विद्यमान अध्यक्षांनी व्यासपीठावरून सभासदांना शांत राहण्याचे आवाहन करत भाषणाला सुरुवात केली़ मात्र, सर्वजण गोंधळ करत इकडे तिकडे पळापळी करत होते़