शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

शिरवळला विजेचा शाॅक लागून कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:45 IST

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील फूलमळा याठिकाणी सिमेंट पोल क्रेनने घेऊन जात असताना २२ के.व्ही. उच्चदाब विद्युत वाहिनीला ...

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील फूलमळा याठिकाणी सिमेंट पोल क्रेनने घेऊन जात असताना २२ के.व्ही. उच्चदाब विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने पोलला धरून जाणाऱ्या खासगी कंत्राटीच्या युवा कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला आहे.

प्रकाश ऊर्फ बाळू बनाजी भंडलकर (वय २४, रा. काळज, ता. फलटण) असे उपचारादरम्यान मयत झालेल्या कामगाराचे नाव आहे, तर संतोष भरत नागणे असे गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या कामगाराचे नाव आहे.

याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शिरवळ येथील फूलमळाजवळ विजेचे पोल खासगी कंत्राटदारामार्फत उभे करण्यात येत होते. यावेळी चार ठिकाणी पोल उभे केल्यानंतर पाचवा पोल उभा करण्याकरिता क्रेनच्या साहाय्याने पोल घेऊन जात असताना पोलला प्रकाश भंडलकर व संतोष नागणे यांनी खालून पकडले होते. यावेळी अचानकपणे सिमेंट पोल घेऊन जात असताना २२ के.व्ही. उच्चदाब विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसला. त्यामुळे पोलला धरलेले प्रकाश भंडलकर व संतोष नागणे हे गंभीर जखमी झाले. संबंधितांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले असता, प्रकाश भंडलकर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या घटनेची फिर्याद सुखदेव गाढवे यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून, अधिक तपास पोलीस अंमलदार मदन वरखडे हे करीत आहेत.