शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

महिलांची जीवन प्राधिकरणवर धडक

By admin | Updated: November 17, 2014 23:27 IST

गृहलक्ष्मी भडकली : मतकर कॉलनीसह परिसरातील झोपडपट्टीत पाच महिन्यांपासून अपुरा पाणीपुरवठा

सातारा : येथील आयटीआय रोडवरील मतकर कॉलनीसह परिसरातील झोपडपट्टीत गेल्या चार-पाच महिन्यांपासून कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. यासंदर्भात वेळोवेळी तक्रार करून दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या महिला आज (सोमवारी) येथील जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात धडकल्या. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.मतकर कॉलनीतील महिलांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मतकर कॉलनीत गेल्या चार-पाच महिन्यांपासून पाणीपुरवठा अनियमित तसेच कमी दाबाने केला जात आहे. यासंदर्भात दि. ३० जून रोजी शाहूपुरी ग्रामपंचायत तसेच सरपंचांना पत्र पाठवून तेथील लोकांची गैरसोय दूर करण्याची मागणी केली होती. मात्र, समस्या न सुटल्याने दि. २ सप्टेंबरला दुसरे पत्र शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांना दिले. मात्र, कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही. मतकर कॉलनी व परिसरातील झोपडपट्टीतील रहिवाशांनी दि. २२ सप्टेंबरला आयटीआय रोडवर धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी जीवन प्राधिकरण कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरही आजतागायत या कॉलनीत व झोपडपट्टीत पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होतच आहे. ज्या दिवशी पाणी सोडले जाते, त्याची वेळ निश्चित नसते. त्यामुळे पाणी सोडल्याचे माहिती होण्यापूर्वी बंद झालेले असते. घरातील पुरुष मंडळी कामावर किंवा गृहिणी मुलांना शाळेत सोडण्यास जातात, त्याचवेळी पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पाणी कधी आले, हे देखील लक्षात येत नाही. त्यामुळे अनेकांची गैरसोयच जास्त होत असल्याने पाणीपुरवठा करण्याची वेळ निश्चित करावी. या परिसरात नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करण्यासंदर्भात योग्य ती उपाययोजना करावी, अन्यथा परिसरातील ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करतील, असाही इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)आठवड्यातील तीन दिवस ठणठणाटया परिसरात सहा महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत स्वरूपात होत असल्यामुळे ग्रामस्थांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच या आठवड्यात कहरच झाला आहे. यामध्ये मंगळवार, दि. ११, बुधवार, दि. १२, शुक्रवार, दि. १४ या दिवसांत पाणीपुरवठाच झालेला नाही. त्यामुळे महिला संतप्त झाल्या आहेत. जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणी सांगण्यासाठी मोठ्या संख्येने महिला आल्या होत्या.