शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

घरात घुसून महिलांना मानसिक त्रास

By admin | Updated: May 3, 2017 23:18 IST

‘मनसे’चा आरोप : मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या मनमानीच्या निषेधार्थ उपोषण

सातारा : कर्जधारक महिलांना अपशब्द वापरून, अश्लील शेरेबाजी व वेळी अवेळी घरात घुसून मानसिक त्रास देणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपनी प्रतिनिधींच्या मनमानी कारभाराची सखोल चौकशी करावी, तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवार, दि. ३ मे पासून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.‘मनसे’च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पश्चिम महाराष्ट्रातील हजारो महिलांना विविध मायक्रो फायनान्स कंपन्यांनी चुकीच्या पद्धतीने कर्जवाटप केले आहे. गावोगावच्या होतकरू व गरजू महिलांना केवळ आधारकार्ड व रेशनकार्डच्या पुराव्यांवर आणि कोऱ्या धनादेशवर सह्या घेऊन कर्जवाटप करण्यात आले आहे. त्यांच्या वसुलीपोटी संबंधित कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य कृतींद्वारे कर्जदार महिलांचे जगणे हैराण केले आहे. या कर्जप्रकरणी कर्ज अदा करण्यापासूनच फसवणुकीस सुरुवात होताना दिसते.गरजू महिलांच्या अडीअडचणीचे भांडवल करून त्यांना चुकीची माहिती सांगून संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांना कर्ज घेण्यासाठी प्रवृत्त करतात. तोंडी माहिती वेगळी, कागदपत्रांवर भलतीच माहिती असे कर्जवसुली बाबत निराळेच धोरण असल्याचे दिसून येत असून, हा सर्वच व्यवहार संशयास्पद आहे, असा आमचा आरोप आहे.मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्जाच्या वसुलीसाठी नेमलेल्या वसुली प्रतिनिधींची शैक्षणिक पात्रता नववी, दहावी, बारावी नापास अशी आहे. त्यांना कर्जवसुलीचे कोणतेही ज्ञान नाहीच व माता-भगिनींशी कसे वर्तन करावे याचीही अक्कल त्यांना नाही. त्यांच्याकडून महिलांच्या कर्जाची वसुली नियमबाह्य केली जात आहे व ते हंगामी कामगार असल्यामुळे त्यांना महिलांबाबत आत्मीयता दिसून येत नाही. तसेच त्यांच्याकडून महिलांच्या कर्जाची वसुली करून त्यांचे कर्ज खात्यात जमा न करता रक्कमेचा अपहार केल्याचे बहुतांशी ठिकाणी दिसून येते. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या त्रासाला कंटाळून कोल्हापूर जिल्ह्यातील आमच्या भगिनी संगीता काटे (रा. रांगोळी, ता. हातकणंगले) यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले आहे, अशी घटना आपल्या राज्यात इतरत्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोरगरीब, कष्टकरी माता-भगिनींचे मायक्रो फायनान्स कंपनीचे कर्ज माफ व्हावे, मायक्रो फायनान्स कंपन्यांनी गोरगरीब, कष्टकरी माता-भगिनींना कर्ज देताना १२ टक्क्यांच्या वर त्यांना व्याजदर घेऊ देणार नाही. या प्रश्न संबंधित फसवणूकग्रस्त महिलांनी प्रांताधिकारी, तहसीलदार कार्यालयाकडे केलेल्या तक्रारी अर्जानुसार संबंधित मायक्रो फायनान्स कंपन्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच संबंधित महिलांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, अशी आमची निवेदनात मागणी करण्यात आली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांच्यासह मराठा महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष सागर जाधव व शिवाजी प्रकाश पाटील व ग्रामस्थ उपोषणात सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)